आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे लग्न करून नांदायला जातात पुरुष, चालतो फक्त महिलाराज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - इंडोनेशियाच्या सुमात्रा येथील मिनांगकबाऊ जगातील सर्वात मोठे स्त्रीप्रधान समाज आहे. या मुस्लिम समुदायात फक्त महिलांचीच सत्ता चालते. पिढ्यांपासून मिळणारे घर, जमीन आणि संपत्तीवर महिलांचा हक्का असतो. अर्थात अशा प्रकारच्या संपत्तीचे विभाजन आजीकडून आईकडे आणि आईकडून मुलीकडे असे केले जाते. कुटुंबातील मोठ-मोठे निर्णय महिला घेतात. फोटोग्राफर सुझॅन स्कलमनने या मातृसत्ताक समाजाची झलक आपल्या कॅमेऱ्यात टिपली आहे. 

 

- मिनांगकबाऊ इंडोनेशियातील 90 लाख लोकसंख्या असलेला मोठा मुस्लिम समुदाय आहे. या समुदायातील कुटुंब प्रमुख महिलाच असतात. कुटुंबातील सगळेच निर्णय आणि घराच्याम मालकीण त्याच असतात. 
- एवढेच नव्हे, तर लग्नानंतर महिला घर सोडून जात नाहीत. तर पुरुषच आपल्या पत्नीच्या घरी नांदायला जातात. 
- कुटुंबातील वाद आणि तंटे सोडवण्यात महिलांची मुख्य भूमिका असते. पुरुष पैसे कमवतात. पण, त्याचे व्यवस्थापन आई किंवा पत्नीच्या हातात असते. 
- जकार्तामध्ये राहणारे एक प्राध्यापक तौफीक अब्दुल्लाह यांनी सांगितल्याप्रमाणे, मिनांगकबाऊ समाजात एखादी महिला गर्भवती झाल्यास तिचे कुटुंबीय मुलगी व्हावी अशी प्रार्थना करतात. 
- 12 व्या शतकाच्या मध्यकाळात राजा महाराजो दिराजोच्या मृत्यूनंतर तीन राणी आणि तीन मुले होती. मुलांचे वय कमी असल्याने राणींनी सत्ता सांभाळली. तेव्हापासूनच ही प्रथा सुरू झाली. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या समुदायाचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...