आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट, एकाच्या रकमेत येतील 400 मर्सेडीझ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - उच्चभ्रू लोक आपल्या प्रतिष्ठेसाठी पैसा पाण्यासारखा ओततात असे आपण ऐकले असेल. एका नंबर प्लेटच्या किमतीवरून त्याचीच प्रचिती आली आहे. ब्रिटनमध्ये जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट विकण्यात आली आहे. एका धनकुबेराने त्या एका नंबर प्लेटसाठी तब्बल 132 कोटी रुपये मोजले आहेत. या नंबर प्लेटवर F1 असा क्रमांक आहे. साऱ्या जगात हा क्रमांक अतिशय लोकप्रीय आहे. सोबतच, मर्सेडीज, मॅकलॅरेन SLR, रेंज रोव्हर आणि बुगाटीसह अनेक कंपन्या हा नंबर बनवतात. या नंबरच्या किमतीची भारतात मिळणाऱ्या मर्सेडीझ ए-क्लास कारच्या (29.31 लाख रुपये) किमतीशी तुलना केल्यास, त्या एका नंबरच्या तुलनेत 400 मर्सेडीझ विकत घेता येतील. 

 

कोण विकतेय हा नंबर?
- नंबर प्लेट विकण्यासाठी ब्रिटनचे अफजल खान यांनी एक जाहिरात दिली होती. ते कस्टमाइज्ड कार डिझाइन करणारी कंपनी खान डिझाइनचे मालक आहेत. 
- सध्या हा नंबर बुगाटी वेरॉनमध्ये लागलेला आहे. त्यांनी हा नंबर गतवर्षी 10.52 कोटी रुपयांत विकत घेतला होता. 
- या नंबर प्लेटची विक्री 110 कोटी रुपयांत होत असली तरीही व्हॅट आणि ट्रान्सफर चार्जेससह त्याची किंमत 132 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. 
- F1 नंतर दुबईचे बलविंदर सहानी यांच्या कारचे नंबर D-5 जगातील दुसरे सर्वात महागडे नंबर आहे. त्याची किंमत 67 कोटींच्या घरात आहे. 

 

भारतात काय आहेत नियम?
- भारतात कस्टममाइज्ड नंबर प्लेटचा नियम नाही. भारतात फक्त RTO कडून स्पेशल नंबरची प्लेट खरेदी केली जाऊ शकते. 
- टू-व्हीलरसाठी स्पेशल नंबर हवा असेल तर 5 हजार ते 50 हजारांपर्यंत मोजावे लागतात. फोर व्हीलरसाठी 15 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत आकारले जातात. 
- त्यातही एका ठराविक नंबरसाठी एकापेक्षा अधिक ग्राहक इच्छुक असतील तर त्यासाठी लिलाव केला जातो. जो अधिक बोली लावणार त्यालाच विक्री केली जाते. 

बातम्या आणखी आहेत...