आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात लठ्ठ मुलाने वजन घटवले, एकावेळी खायचा 5 जणांचे जेवण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - इंडोनेशियात राहणारा जगातील सर्वात लठ्ठ मुलाग आर्य परमाना पुन्हा चर्चेत आला आहे. आर्यने सर्जरी करून आपले 190 किलोंचे वजन निम्मे केले आहे. अवघ्या 10 वर्षांचा असताना सुद्धा तो एका वेळी 5 जणांचे जेवण खायचा. वजन इतके वाढले होते, की त्याला उभे राहणे सुद्धा कठिण बनले होते. त्यामुळे, दिवसभर तो झोपलेल्या अवस्थेतच राहायचा. सर्जरीपूर्वी त्याला इंडोनशियन वर्ल्ड रेकॉर्ड म्यूजियमने सर्वात लठ्ठ मुलाचा किताब दिला होता. 


पुन्हा शाळेत जातोय आर्य
- गतवर्षी जकार्ताच्या ओमनी हॉस्पिटसमध्ये 12 वर्षीय आर्यवर गॅस्ट्रिक स्लीव्ह ऑपरेशन पार पडले. त्याचा पोटाचा एक मोठा भाग काढावा लागला. जेणेकरून तो स्वतःला खाण्यापासून थांबवू शकेल. 
- यानंतर आर्यनच्या वजनात कमालीची घट झाली. आता तो पुन्हा आपल्या पायावर उभा राहू शकतो आणि चालतानाही त्याला त्रास होत नाही. आपल्या मित्रांसोबत तो शाळेत जायला लागला आहे. तो दररोज फुटबॉल आणि बॅडमिंटन सुद्धा खेळत आहे. 
- आर्यने सांगितले, माझी खूक आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. 6 चमचे खाऊनही आता माझे पोट भरते. मी गोड पदार्थ सुद्धा खात नाही. तसेच सॉफ्ट ड्रिंक्स सुद्धा बंद केले. 


असे होते दिवसभराचे डायट
- आर्य सर्जरीपूर्वी 5 जणांचे जेवण आरामात सर करायचा. त्याच्या डायटमध्ये फ्राइड चिकन, राइस, नूडल्स आणि चॉकलेट आइसक्रीमचा देखील समावेश होता. 
- सिक्युरिटी गार्डचे काम करणाऱ्या त्याच्या वडिलांनी सांगितले, की तो 2 पॅकेट नूडल्स, 2 अंडी, अर्धा किलो चिकन आणि राइस असा आहार दिवसातून 6 वेळा खात होता. 
- पालक म्हणून आपल्या मुलाला दिवसभर बेडवर पडलेला पाहणे अतिशय कठिण होते. त्याला उचलले तरीही उभे राहूनच दम लागायचा. 


आईच्या लाडात बिघडला
- आर्यच्या त्या परिस्थितीसाठी त्याच्या आईला जबाबदार धरले जाते. तिला आपल्या चुकीबद्दल पश्चाताप देखील होतो. आपल्या मुलावर खूप प्रेम करत होते. त्यामुळे, त्याला कितीही खायला देत होते असे आई सांगते. 
- आर्य जन्मला तेव्हा त्याचे वजन फक्त 3.2 किलो होते. तो दोन वर्षांचा झाला तोपर्यंत त्याचे वजन अगदी सामान्य होते. पण, त्यानंतरच वजन वाढण्यास सुरुवात झाली. 
- हळू-हळू त्याचे वजन इतके वाढले की तो जाड व्हायला लागला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. काही वर्षांतच तो आपल्या आई वडिलांपेक्षा मोठा दिसत होता. 
- 5 ते 9 वर्षांच्या वयात त्याचे वजन 127 किलो झाले. शाळेत एका कार्यक्रमात उभे राहिल्याने तो बेशुद्ध पडला. तेव्हापासूनच त्याला शाळा सोडावी लागली आणि घरात वजन आणखी वाढत गेले. 


पुढे पाहा, आर्यचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...