आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिुंदू संस्कृती जपणारा मुस्लिम बहुल देश; मंदिरात मुस्लिमच करतात रामलीला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जकार्ता - पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 दिवसांच्या दक्षिण आशियाई देशांच्या दौऱ्यावर आहेत. यात बुधवारीच पीएम मोदींनी इंडोनेशिया दौरा केला. तसेच मलेशियाकडे निघाले. इंडोनेशिया जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे. मुस्लिम लोकसंख्या अधिक असली तरी या देशाने हिंदू संस्कृती जपली आहे. एवढेच काय तर मुस्लिम येथील हिंदू संस्कृती जपण्यात मोलाचे योगदान देत आहेत. येथे रामायण आणि महाभारताची झलक पाहायला मिळते. भगवान गणेशपासून हनुमान पर्यंत सर्व देवांचे मंदिर आहेत. जर्काता स्क्वेअरमध्ये लावलेली कृष्णा आणि अर्जुनच्या मूर्ती जगप्रसिद्ध आहेत. मुस्लिम समुदाय सुद्धा येथील मंदिरांमध्ये रामलीला सादर करताना दिसून येतो. 


6 धर्मांना अधिकृत मान्यता
- इंडोनेशियात एकूण 6 धर्मांना अधिकृत मान्यता आहे. यात प्रामुख्याने हिंदू धर्माचा समावेश आहे. बाली, जावा आणि लंबोकमध्ये हिंदू समुदाय सर्वाधिक आहे. 
- बालीला तर हिंदू इंडोनेशिया असेही म्हटले जाते. तर जावा बेटावर हिंदू आणि बौद्ध मंदिर मोठ्या संख्येने दिसून येतात. 
- जावा आयलंडवर ठिक-ठिकाणी संस्कृत भाषेत केलेले लिखान पाहायला मिळते. तसेच महाभारत आणि रामायणचा सुद्धा उल्लेख दिसून येतो.


हजारो वर्षांचे नाते...
- इंडोनेशियात 5 व्या शतकात हिंदू धर्माचा प्रसार झाला असे म्हटले जाते. भारत आणि इंडोनेशियात येशू ख्रिस्तांच्या जन्मापूर्वीचे व्यापारिक संबंध आहेत. त्यामुळेच, दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक साम्य पाहायला मिळते. 
- याच व्यापार आणि उद्योगाच्या बळावर श्रीविजया साम्राज्याचा व्याप झाला होता. त्यांच्या शासनात हिंदू, बौद्ध धर्माचा सर्वाधिक प्रचार आणि प्रसार झाला. 
- यानंतर 8 व्या आणि 10 व्या शतकात जावा येथे बौद्ध आणि हिंदू धर्माचा प्रसार झाला. बौद्ध-हिंदू संस्कृती स्थापित झाल्या. 13 व्या शतकात पूर्व जावा येथे हिन्दू मजापहित साम्राज्याची स्थापना झाली. त्यावेळी झालेला बौद्ध आणि हिंदू संस्कृतीच्या विकासाची छाप आजही इंडोनेशियात दिसून येते. आज इंडोनेशियात हिंदूंची संख्या 2 टक्के आहे.


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...