आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरेक्यांविरुद्ध कारवाईसाठी एनएसजीचे कमांडो श्रीनगरमध्ये; एक पथक २ आठवड्यांपूर्वीच दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा नायनाट करण्याची जबाबदारी आता 'ब्लॅक कॅट' नावाने प्रसिद्ध नॅशनल सेक्युरिटी गार्डस््वर (एनएसजी कमांडोज) सोपवण्यात येणार आहे. ५१ एसएजीचे सुमारे २४ कमांडोंचे पथक दोन आठवड्यांपूर्वीच श्रीनगरजवळ हुमहुमा बीएसएफ छावणीत दाखल झाले आहे. स्थानिक वातावरणाची सवय व्हावी म्हणून या कमांडोंना कठोर प्रशिक्षण दिले जात आहे. येथील वातावरणात ते मिसळले की त्यांना दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत उतरवले जाईल. गृह मंत्रालयानुसार, लवकरच आणखी १०० कमांडो येथे दाखल होत आहेत. 


फुटीरवाद्यांवर अंकुश 
गुरुवारी अनेक फुटीरवाद्यांना अटक झाली. जेकेएलएफचा नेता यासीन मलिक याला अटक, तर हुरियत नेता सय्यद अली शहा गिलानी, फुटीरवादी नेता मीरवाइज मौलवी उमर फारूख आणि मोहम्मद अशरफ सहराई यांना घरातच नजरकैदेत आहे. प्रसिद्ध जामा मशीदही बंद करण्यात अाली अाहे.

 

बातम्या आणखी आहेत...