आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियात एक दिवसात 2 फूट बर्फवृष्टी; 61 वर्षांचा विक्रम मोडीत, लष्कराला बोलावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को- हिमवादळामुळे रशियाचे जीवन अस्ताव्यस्त झाले आहे. मॉस्कोत तर बर्फवृष्टीचा ६१ वर्षांचा विक्रम मोडला. तेथे एक दिवसात २ फूट (६२ सेंमी) बर्फवृष्टी झाली. याआधी एका दिवसात सर्वाधिक ३८ सेंमी बर्फवृष्टी १९५७ मध्ये झाली होती. बर्फवृष्टीचा वेग १०० वर्षातील सर्वाधिक आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी लष्कराच्या २ तुकड्या आणि १०० अभियंत्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे.  

 

ठळक मुद्दे 
- लष्कराच्या २ तुकड्या, १०० अभियंते तैनात  
- १०० वर्षांनंतर एवढ्या वेगाने बर्फवृष्टी    

 

२३० उड्डाणे प्रभावित, एका युवकाचा मृत्यू  
राज्यपाल सर्जेई सोबियानिन यांनी मॉस्कोत आणीबाणी जाहीर केली. आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे २७० उड्डाणे प्रभावित झाली. ६० उड्डाणे रद्द झाली. रस्त्यांवर २००० पेक्षा जास्त झाडे पडल्याने ५३ अपघात झाले. त्यात एका युवकाचा मृत्यू झाला. २५ जण जखमी झाले. अपघातांमुळे ५२०० लोक वाहनांत अडकले आहेत.  


७० हजार घरांत वीज गायब, थर्मामीटर तुटले  
मॉस्कोसह चार शहरांत ७० हजार घरांतील वीज गायब आहे. यकुतिया प्रांतात तर पारा अजूनही उणे ५० अंशांखाली आहे. प्रचंड थंडीमुळे थर्मामीटरही तुटले आहेत.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, पश्चिम कमांडचे जवान कार्यरत .... 

 

बातम्या आणखी आहेत...