आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँड्राॅइडमार्फत एकाधिकाराचा दुरुपयाेग; गुगलला वीस हजार कोटी दंडाची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रुसेल्स- अँड्राॅइडमार्फत एकाधिकाराचा दुरुपयाेग केल्याप्रकरणी गुगल कंपनीवर या अाठवड्यात किमान २० हजार काेटींचा दंड ठाेठावला जाऊ शकताे. गुगल माेबाइल बनवणाऱ्या कंपन्यांना अापले अँड्राॅइड साॅफ्टवेअर माेफत देते, मात्र त्या बदल्यात गुगल वेब ब्राउझर व सर्च इंजिनसारखे अॅप इन्स्टाॅल करण्याची सक्ती करते, असा गुगलवर अाराेप अाहे. 


युराेपच्या स्मार्टफाेन मार्केटमध्ये अँड्राॅइड फाेनचा ७४ % हिस्सा अाहे. या कंपन्यांनी तक्रार केली हाेती की, गुगलच्या दबावामुळे अाम्हाला दुसऱ्या कंपन्यांचे सर्च इंजिन व ब्राउझरचा वापर करता येत नाही. या अाराेपाचे खंडन करताना गुगलने अामच्याकडून फाेन उत्पादकांवर दबाव नसल्याचे स्पष्टीकरण दिले हाेते. युराेपातील प्रतिस्पर्धी अायाेगाचे प्रमुख मार्गारेट वेस्टेजर तीन वर्षांपासून या प्रकरणाची चाैकशी करत हाेते. या अायाेगाला गुगलचे 'पालक कंपनी' अल्फाबेटच्या वार्षिक उलाढालीच्या १० % दंड लावण्याचा अधिकार अाहे. मागील वर्षी या कंपनीची उलाढाल ११० अब्ज डाॅलर हाेती. म्हणजे दाेषी ठरल्यास गुगलवर ११ अब्ज डाॅलरपर्यंत (७५ हजार काेटी) दंड ठाेठावला जाऊ शकताे.

बातम्या आणखी आहेत...