आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूलमध्ये मजारीजवळ आत्मघाती हल्ल्यात 29 ठार, 52 जखमी; 7 वर्षांतील तिसरी घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबूल- अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका मजारीजवळ झालेल्या बाँबस्फोटात २९ जणांचा मृत्यू झाला, तर ५२ लाख जखमी झाले. पारसी समुदायाचे लोक नवरोज साजरा करण्यासाठी जमले असताना हा हल्ला झाला. काबूल विद्यापीठ व अली आबाद रुग्णालयादरम्यानच्या गर्दीत झाला. याच परिसरात अल्पसंख्याक शिया समुदायाचे धार्मिक स्थळही आहे. येथे बाँबस्फोटावेळी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या धार्मिक स्थळावरील हा सात वर्षांतील तिसरा हल्ला आहे. अगोदर २०१६ मध्ये झालेल्या हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू झाला होता. सध्या शिया समुदायाचे लोक अशुरा सण साजरा करत होते. २०११ मध्ये येथे झालेल्या हल्ल्यात ५९ जणांचा मृत्यू झाला होता. आत्मघाती हल्लेखोरांनी पायी चालत येऊन हा हल्ला घडवला. त्यांच्याकडे वाहन दिसून आले नाही, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

 

साखी काबूलमधील सर्वात मोठे धर्मस्थळ
साखी काबूलमधील सर्वात मोठी धर्मस्थळ आहे. येथे दरवर्षी नवरोजच्या निमित्ताने प्रार्थनेचे आयोजन करण्यात येते. अफगाणिस्तानात नवरोज धूमधडाक्यात साजरा केला जातो. नवरोज पारसी नववर्षाचा पहिली दिवस अाहे. या दिवशी राष्ट्रीय सुटीही असते. या दिवशी धार्मिक स्थळी प्रार्थना करतात.
- अफगाणमध्ये १५ टक्के शिया समुदायाचे आहेत. बहुतांश हाजारावंशीय आहेत.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, काबूलमध्ये या वर्षातील तिसरा मोठा हल्ला.... 

बातम्या आणखी आहेत...