आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय आयटी कंपन्यांच्या एच-1 बी व्हिसा मंजुरीत 43 टक्के कपात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन -  भारतातील आघाडीच्या आयटी कंपन्यांच्या एच-१ बी व्हिसा मंजुरीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. एका अहवालानुसार वर्ष २०१५-१७ दरम्यान यामध्ये ४३% कपात झाल्याचे वास्तव समोर आले आहे. द नॅशनल फाउंडेशन फॉर अमेरिकन पॉलिसीच्या वतीने हा अहवाल जारी करण्यात आला आहे.  आर्थिक वर्ष २०१७ साठी भारताच्या आघाडीच्या ७ आयटी कंपन्यांचे केवळ ८,४६८ अर्ज स्वीकारले गेले. २०१५ च्या तुलनेत यामध्ये ४३% घट दिसून आली. २०१५ मध्ये १४,७९२ एच-१ बी व्हिसा जारी करण्यात आले होते.  

 

एच-१ बी व्हिसासाठीची मर्यादा खूप कमी 
या अहवालात म्हटले आहे की, २०१७ मध्ये एकूण १ लाख ९९ हजार अर्ज करण्यात आले होते. यासाठी निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा ही संख्या १ लाख ५ हजार अधिक होती. कोणत्या कंपन्यांना व्हिसा मिळत आहेत, ही यात मुख्य समस्या नाही. अमेरिकेचा आर्थिक आवाका पाहता ८५ हजार व्हिसा मर्यादा फार कमी आहे, हा मूळ मुद्दा आहे.  २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये केवळ टीसीएस आणि टेक महिंद्राला मिळणाऱ्या व्हिसाच्या संख्येत वाढ झाली आहे. इन्फोसिस, विप्रो, एचसीएल अमेरिका, लार्सन अँड टुब्रो आणि माइंडट्रीच्या व्हिसा मंजुरीमध्ये घसरण झाली आहे.  यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसकडून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे हा अहवाल जारी करण्यात आला आहे.  

 

व्हिसा मंजुरीत घसरणीची कारणे  

 

* द नॅशनल फाउंडेशन फॉर अमेरिकन पॉलिसीच्या माहितीनुसार, उद्योगातील बदलांमुळे भारतीय कंपन्यांसाठी एच-१ बी व्हिसाची संख्या कमी होत आहे. क्लाउड कम्प्युटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या डिजिटल सेवांमुळे कर्मचाऱ्यांवरील अवलंबित्व घटले आहे.  

 

* त्यामुळे कंपन्या एच-१ बी व्हिसाऐवजी अमेरिकेत उपलब्ध स्थानिक कर्मचारी संख्या वाढवण्यावर भर देत आहेत. बहुतांश प्रकल्पांमध्ये खूप कमी कर्मचाऱ्यांची गरज भासत आहे. बहुतांश कंपन्या कर्मचाऱ्यांना बोलावण्याऐवजी अमेरिकेच्या बाहेरून काम करून घेण्यावरही भर देत आहेत. त्यामुळेही व्हिसा अर्ज मंजुरीत घट झाली.  


* अमेरिकी आणि भारतीय कंपन्यांच्या ग्राहकांकडून डिजिटल अभियांत्रिकी आणि अधिक अद्ययावत सुविधांची मागणीही वाढत आहे. डेटा अॅनालिसिससारख्या कामासाठी कर्मचाऱ्यांकडून अधिक तंत्रज्ञानाभिमुख असण्याची गरज असते.  

 

पुढील स्लाईडवर पहा, कोणत्या कंपनीला किती व्हिसा मिळेल .......

 

 

बातम्या आणखी आहेत...