आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोटीत नवऱ्याकडून पैसे उकळण्यासाठी सहा महिन्यांच्या जुळ्या मुलींना मारहाण, गळा दाबला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सौदी अरबमधील एक महिला मुलींना टॉर्चर करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ मुलींच्या आईनेच तयार केला आहे. या व्हिडिओत आई मुलींना मारहाण करताना आणि गळा दाबताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडओला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. त्यानंतर महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. महिलेने चौकशीत सांगितले की, तिने हे सर्व तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीकडून पैसे हडपण्यासाठी केले होते. 


मारण्याची धमकी देत होती आई... 
- सौदीच्या मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड सोशल डेव्हलपमेंटच्या माहितीनुसार व्हिडिओ पब्लिक प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर महिलेला अटक केली आहे. महिला मुलींचा गळा दाबत त्यांना मारून टाकण्याची धमकी देत होती. 
- ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ अपलोड केला आहे, तो मूळचा यमनी मोहनाद अल हस्दी हा आहे. त्याचे स्वतःचे यूट्यूब चॅनल आहे. त्याने सांगितले की, व्हिडिओमध्ये दिसणारी महिला, सोमालियन आहे. सध्या ती सौदी अरबमध्ये राहत होती. तिने एका यमनी वंशाच्या व्यक्तीबरोबर लग्न केले होते. जेव्हा दोघांचा घटस्फोट झाला तेव्हा महिलेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. 
- अशा परिस्थितीत तिला मुलींना टॉर्चर करून तिच्या घटस्फोटीत पतीकडून पैसे उकळायचे होते. जेव्हा हा व्हिडिओ मुलींच्या आजोबांना पाठवण्यात आला तेव्हा त्यांनी या मुलींना सोडवण्यासाठी त्यांचा यूट्यूब फ्रेंड अल हस्दी याला हा व्हिडिओ अपलोड करण्यास सांगितले. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर महिलेला अटक करण्यात आली आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...