आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील शालेय मुले दहशतीत, वारसा पत्र लिहून म्हणतात, प्ले स्टेशन मित्राला तर कपडे आई-बाबांना द्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंगहॅम - मागील महिन्यात अमेरिकेतील फ्लोरिडात एका शाळेमध्ये गोळीबार झाला. यात १७ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अमेरिकेतील शालेय मुलांमध्ये इतकी प्रचंड दहशत पसरली आहे की मुले स्वत:चा वारसा हक्क लिहून ठेवत आहेत.

 

बर्मिंगहॅम शहरात सहावीच्या जावो डॅव्हिस या विद्यार्थ्याने वारसा पत्र तयार केले. जावोला वारसा हक्क काय असतो याची माहिती नाही, पण देवाघरी जाताना प्रत्येक व्यक्ती स्वत:ला आवडणाऱ्या वस्तू जवळील व्यक्तीला सोपवतात ही माहिती आहे. त्यामुळे जावोने एका कागदावर जिवलग मित्राला संबोधून वारसा पत्र लिहिले.  


या वारसा पत्रात जावोने म्हटले आहे की,  ‘जर माझ्या शाळेत गोळीबार झाला आणि मला देवाघरी जावे लागले तर माझे प्ले स्टेशन आणि पेन्सिलचा बॉक्स जिवलग मित्राला देण्यात यावा. माझे कपडे आई-बाबांकडेच द्यावेत.’ जावोच्या स्कूल बॅगमध्ये आढळलेले वारसा पत्र वाचून त्याच्या आईला धक्काच बसला. त्यांनी शाळेत जाऊन अधिक माहिती घेतली असता केवळ जावोच नाही तर त्याचे इतर मित्रही अशाच प्रकारचे वारसा पत्र तयार करत होते. शाळेत गोळीबार होऊन आपला मृत्यू होईल अशी भीती मुलांच्या मनात बसली आहे.


जावोची आई मरियामा म्हणाली की, ज्या वयात मुलांना वारसा हक्काचा अर्थ कळत नाही त्या वयात ते वारसा पत्र लिहीत आहेत.जावोसारख्या मुलांनी हसत-खेळत आपले जीवन घालवले पाहिजे. आता त्यांनी वारसा हक्काबद्दल विचारही करू नये. कुठलेही आई-वडील आपल्या मुलाला भीतिदायक वातावरणात मोठा होताना पाहू शकत नाहीत.

 

बारा वर्षांच्या जावो डॅव्हिसचे वारसा पत्र...

शाळेत सध्या भांडण करणाऱ्या मुलांची संख्या वाढली आहे. माझ्या शाळेत एखाद्या वाईट मुलाने गोळीबार केला तर मी देवाघरी जाईन. असे झाल्यास माझ्या सर्व वस्तू जिवलग मित्र आणि कुटुंबीयांकडे देण्यात याव्यात. माझे प्ले स्टेशन, टीव्ही, मांजर आणि आवडते जॉमेट्री बॉक्स माझ्या जिवलग मित्राकडे असेल. तो शाळेत नेहमी माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतो. परंतु माझे कपडे आई-बाबांकडेच असतील. माझ्या आई-बाबांनी मला नेहमी आवडीचे कपडे खरेदी करून दिले आहेत. दोघेही मला खूप प्रेम करतात. ते माझ्यासोबत असतात. मी देवाघरी सुखरूप असेन. काळजी बिलकुल करू नका. तुमचा जावो...

बातम्या आणखी आहेत...