आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरिया क्षेत्रातील परिस्थिती अत्यंत गंभीर वळणावर; संयुक्त राष्ट्राच्या प्रतिनिधीचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो - Divya Marathi
सांकेतिक फोटो

वॉशिंग्टन / टोकियो- उत्तर कोरियाहून परतलेल्या संयुक्त राष्ट्राचे प्रतिनिधी जेफ्रे फॅल्टमॅन यांनी कोरिया क्षेत्रातील परिस्थिती अत्यंत गंभीर तसेच तणावपूर्ण असल्याचे म्हटले आहे. आजघडीला कोरियाचा प्रश्न सर्वात मोठे संकट व शांतता-सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.


कोरियाचे अधिकारी म्हणाले, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या सर्व प्रस्तावांना लागू करणे गरजेचे आहे. उत्तर कोरियाच्या पाच दिवसांच्या दौऱ्याहून ८ डिसेंबरला परतणारे फॅल्टमॅन यांनी उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री रि याँग हो व उपमंत्री पीएके म्याँग गूक यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. उत्तर कोरियाचा प्रश्न कूटनीतिद्वारे सोडवला जाऊ शकतो.
दक्षिण कोरियाने निर्बंधात पुन्हा केली वाढ दक्षिण कोरियाने उत्तर कोरियावर दबाव वाढवण्यासाठी नवीन निर्बंध लादले आहेत. निर्बंधाची कक्षा वाढवली आहे. बँक, व्यापारी कंपन्या,१२ बँकर व उद्योजकांसह उत्तर कोरियाच्या २० संस्थांना सोमवारपासून काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.


दरम्यान, कोरिया क्षेत्रातील संकट दूर करण्यासाठी निर्बंधासह काही उपाययोजनांचे उत्तर कोरियाचा मित्र चीनने समर्थन केले असले तरी क्षेत्रातील तणाव निवळावा यासाठी चर्चेतून मार्ग काढण्याची भूमिका चीनने घेतली आणि तिला रेटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे तोडगा निघालेला नाही. त्यात संयुक्त राष्ट्राच्या राजनैतिकाने केलेल्या वक्तव्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायापुढे ही मोठी समस्या बनली आहे. 

 

आज जपान,दक्षिण कोरिया, अमेरिकेचा संयुक्त सराव 
उत्तर कोरियाच्या अणु चाचणीचा धोका लक्षात घेऊन जपान, अमेरिका व दक्षिण कोरिया सोमवारपासून दोन दिवसांच्या संयुक्त क्षेपणास्र निगराणी संबंधी संयुक्त अभ्यासाला सुरूवात करणार आहेत. या प्रकल्पात तीन देश निगराणी बाबत परस्परांत माहितीची देवाण-घेवाण करतील. जपानच्या नौदलाने रविवारी यासंबंधीची माहिती दिली. अमेरिका व दक्षिण कोरियाने गेल्या आठवड्यात मोठ्या पातळीवर लष्करी सराव केला होता. या अगोदर अमेरिका, जपान व दक्षिण कोरियाच्या सैन्याने संयुक्त सराव केला होता.

 

बातम्या आणखी आहेत...