आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेला भाेगावे लागू शकतात शी यांच्या हुकूमशाहीचे परिणाम, साेशल मीडियावर बंदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - विधान काही शब्दांचेच हाेते; परंतु त्यात बाॅम्बस्फाेटाची शक्ती हाेती व त्याचा अावाज २४ फेब्रुवारीला संपूर्ण जगाला एेकू गेला : चीनचा सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष (सीसीपी) देशाच्या राष्ट्रपतिपदासाठीची काेणत्याही व्यक्तीच्या पाच वर्षांच्या दाेन कार्यकाळांची मर्यादा संपुष्टात अाणत अाहेे.


याचा अर्थ अाहे की, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे अाता जगातील सर्वाधिक लाेकसंख्या असलेल्या देशावर मनाला वाटेल ताेपर्यंत हुकूमत गाजवू शकतात. चीनच्या राजकारणावर ‘द काॅन्फरन्स बाेर्ड’चे बीजिंग येथील तज्ज्ञ ब्लॅंचेट म्हणतात की, ‘हे चीनच्या एक व्यक्ती संचालित पद्धतीत रूपांतरित हाेण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल अाहे. मात्र, तूर्त यास असे म्हणणे थाेडे कठीण अाहे की, चीन वा जगासाठी हे एक माेठे पाऊल अाहे.’ गत ४० वर्षांपासून सीसीपीने देशातील हुकूमशहा प्रशासनाला संस्थानीकरणाचा मुकुट घालून ठेवला अाहे की, एक व्यक्ती किंवा कुटंुबाएेवजी सर्व १.४० अब्ज लाेकांच्या कथित कल्याणासाठी पक्षाकडे सत्तासूत्रे अाहेत. वय अाणि कार्यकाळाच्या मर्यादेसारख्या कठाेर शिष्टाचारांनी याची वैधता स्थापित करण्यास मदत केली.

 

मात्र, २०१३मध्ये राष्ट्रपती बनल्यापासून शी यांनी बंदी वाढवून, वकील व अांदाेलकांना कारागृहात टाकून अाणि स्वत:ची प्रशंसा करणाऱ्या प्रचाराला हवा देत या संरक्षक उपायांपासून मुक्ती मिळवली. त्यांची छाप असलेल्या तत्त्वज्ञानाचा गतवर्षी देशाच्या राज्यघटनेत समावेश करण्यात अाला. या सर्व घडामाेडींनंतर कार्यकाळाची मर्यादा संपवण्यास तर पुढील तर्कसंगत पाऊलच म्हटले जाईल.


अाता एकच माणूस जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवर स्वत:चा मृत्यू, मर्जीने पदत्याग करणे वा त्यास हटवले जाईपर्यंत सत्ता गाजवेल. त्यामुळे अाशियाई महाशक्ती पुन्हा एकदा हुकूमशाहीकडे जात असल्याची भीती व्यक्त हाेत अाहे. गत काही वर्षांत हुकूमशाही राजकीय व्यवस्थांना कसे सामान्य मानले जातेय, याचे हे खुले प्रदर्शन अाहे. अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या (मुक्त काैतुकाने नाही तर...)नंतर सहमतीने रशियाचे व्लादिमीर पुतीन, पॅलेस्टाइनचे राॅड्रिगाे दुतेर्ते व तुर्कीचे रिसेप एर्दाेगन यासारख्या बाहुबलींनी स्वत:ची सत्ता मजबूत करण्यासाठी लाेकशाहीलाच चिरडून टाकले अाहे. शी यांच्या या निर्णयाबाबत विचारल्यावर ‘हा निर्णय चीनसाठी अाहे’ असे व्हाइट हाऊसच्या प्रसारमाध्यम सचिव सारा संॅडर्स यांनी सांगितले.


असे असू शकते; परंतु याचा प्रभाव याच्यानंतरही अनुभवला जाऊ शकताे. घरात स्वत:ची सत्ता मजबूत करण्यासह शी हे जागतिक व्यासपीठावरही स्वत:चे घाेडे पुढे दामटवत अाहेत. त्यांचा विशेष प्रकल्प बेल्ट अॅण्ड राेड इनिशिएटिव्ह, जाे प्राचीन रेशम मार्गावर तयार केला जाणारा व्यापार व पायाभूत बाबींचे नेटवर्क अाहे, ताे चीनच्या भूराजनैतिक प्रभावात अामूलाग्र बदलांसाठी अाणला जात अाहे. यासाठी त्यांनी बीजिंगमध्ये अांतरराष्ट्रीय विकास बँकही स्थापन केली अाहे व डिजिबाऊतीत चीनचे पहिले विदेशी सैन्यस्थळही तयार केले अाहे.


अाता तर शी यांनी स्वत:च्या देशात खुलेअाम राजकीय कट‌्टरपंथाचा अध्याय लिहून टाकला अाहे. त्यामुळे विदेशात त्यांना व्यापार व दक्षिण चीन समुद्रासारख्या क्षेत्रीय सीमा वादांवर कायदा-नियमांना फाेल ठरवणे साेपे हाेईल. याचे संकेत तर फार पूर्वीपासूनच मिळत अाहेत. शी यांच्या या निर्णयाचे गंभीर परिणाम सर्वात जास्त चीनच्या नागरिकांना भाेगावे लागू शकतात. सध्या तरी शी यांना चीनमध्ये विराेध नाही; परंतु अार्थिक अस्थिरता किंवा काेणत्याही संकटाचा व्यवस्थित सामना न केल्यावर देशात असंताेष निर्माण हाेऊ शकताे. इकाॅनाॅमिक इंटेलिजन्स युनिटमध्ये चीनचे व्यवस्थापक टाॅम म्हणतात की, या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी भीतीमुळे शी हे दमन व राजकीय निलंबन अादी पाऊल उचलू शकतात.


माअाेसारख्या अाणखी एका नेत्याचा उदय हाेऊ नये म्हणून सुधारक देंग शियाअाेपिंगनुसार पक्षनेतृत्वाने पक्ष कार्यकारिणी के माच्या अंतर्गत सामूहिक नेतृत्वाचा विचार अाणला व राष्ट्रपतिपदाच्या कार्यकाळाची मर्यादा निश्चित केली; जेणेकरून नेतृत्वाचे सहजरीत्या हस्तांतरण व्हावे. मात्र, अाता शी यांनी या नियमांचे खुलेअाम उल्लंघन करणे सुरू केल्याने अागामी काळात उत्तराधिकारी निवडण्याचे संकट निर्माण हाेऊ शकते. हा संवेदनशील मुद्दा सीसीपी जाणून अाहे. त्यामुळे या विषयावर चर्चा सुरू हाेताच पक्षाने साेेशल मीडियावरील पाेस्टवर तत्काळ बंदी अाणली व सीएनएनसारख्या अांतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांना ब्लाॅक करून टाकले; परंतु एके दिवशी देशाला या मुद्द्याचा सामना करावाच लागेल. ब्लॅंचेट म्हणतात की, देशातील सम्राट किती कालावधीपर्यंत सत्तेवर राहील व केव्हा सत्ता साेडेल? ही चीनची हजाराे वर्षे जुनी समस्या अाहे. मात्र, अाता ही समस्या उर्वरित जगाचीदेखील बनली अाहे.

 

स्वत: शी हे माअाेच्या मर्जीचे बळी ठरले हाेते

काे   णत्याही इतर व्यक्तींपेक्षा शी यांना हुकूमशाही प्रवृत्तीच्या क्रूरतेची अधिक चांगली माहिती अाहे. त्यांच्या वडिलांना पक्षाचे संस्थापक माअाे त्से-तुंग यांनी पक्षातून वारंवार बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे चीनच्या नागरिकांनाही माेठा त्रास भाेगावा लागला. सामूहिक अाैद्याेगिकीकरणाचा विक्षिप्त प्रयाेग ‘ग्रेट लीप फाॅरवर्ड’च्या १९५८ ते १९६२दरम्यान ४.५ काेटी नागरिक मारले गेले हाेते. अापल्या लाखाे समकालीन व्यक्तींप्रमाणे शी जिनपिंग यांनाही १९६६ ते १९७६पर्यंत चाललेल्या सांस्कृतिक क्रांतीच्या काळात ग्रामीण भागात विस्थापित केले गेले हाेते.

 

बातम्या आणखी आहेत...