आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात पुन्हा बुद्ध हसला, 11 वर्षांपूर्वी तालिबानी अतिरेक्यांनी उद्धवस्‍त केले होते शिल्‍प

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर- 2007 मध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी स्वात खोऱ्यातील पाषाणावरील भगवान गौतम बुद्धांचे कोरीव शिल्प डायनामाइटने उडवून दिले होते. आता 17 वर्षांनंतर हे शिल्प पूर्ववत साकारले आहे. 20 फूट उंचीचे हे बुद्ध शिल्प सुमारे 1400 वर्षांपूर्वीचे आहे. 2012 मध्ये शिल्पाच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले होते. अनेक टप्प्यानंतर ते पूर्ण झाले.

 

शिल्प पूर्ववत करण्याच्या कामात इटलीच्या तज्ज्ञांनी योगदान दिले. हे तज्ज्ञ खोऱ्यातील सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठीदेखील मदत करणार आहेत. त्यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळू शकेल. इटली सरकारनेही या प्रकल्पासाठी 20 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 

 

थ्री-डी तंत्रज्ञानाच्या साह्याने नूतनीकरण 
मूर्तीचे जुने छायाचित्रे व थ्री-डी तंत्रज्ञानाच्या मदतीने शिल्पाचे नूतनीकरण करण्यात आले. इटलीच्या तज्ज्ञांनी मूर्तीला पूर्वीसारखे हुबेहूब बनवले आहे. काही खुणाही जाणूनबुजून ठेवण्यात आल्या आहेत. कारण मूर्तीला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न झाला होता, हे लक्षात यावे यासाठी या खुणा ठेवल्या आहेत. 

 

इस्लामपूर्वी हाच तर आमचा धर्म होता

स्‍वात खो-यातील प्रमुख मिंगोरा येथे एक बौद्ध संग्रहालय सुरू करण्यात आले आहे. येथे ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यात आले आहे. त्याचे प्रमुख फैज-उर-रहेमान म्हणाले, बौद्ध धर्माला पसंत करणाऱ्या मुल्लांचे स्वागत आहे. इस्लामपूर्वी हाच तर आमचा धर्म होता, असे त्यांनी सांगितले. 

 

बामियानमध्येही मूर्तीवर हल्ला 

2001 मध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानातील बामियानमध्ये बुद्ध मूर्तीला उडवून दिले होते. त्यामधील एक मूर्ती 56 मीटर उंच होती.  

 

पुढील स्‍लाइडरवर पाहा, पुर्ववत करण्‍यात आलेल्‍या शिल्‍पाची विहंगमय दृश्‍ये...व्हिडिओ आणि फोटो...

बातम्या आणखी आहेत...