आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वीही 12 लाख नोकऱ्या गेल्या होत्या, पुन्हा तसेच धोरण; ट्रम्प यांनी सुरू केले व्यापार युद्ध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 मॉली बॉल / अॅलन मरे- अमेरिकेत पोलाद निर्मितीची सर्वात मोठी कंपनी न्यूकोरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन फेरिआेला यांना २८ फेब्रुवारी रोजी व्हाइट हाऊसमधून एक फोन आला होता. त्यांना दुसऱ्या दिवशी येथे येण्याचे निमंत्रण देण्यात आले. जॉन तेथे पोहोचले. त्यांना धातुनिर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्यांचे सीईआे तेथे भेटले. त्यांची गोपनीय बैठक लवकरच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत होणार आहे. सर्वच यामुळे चकित झाले आहेत.  


ट्रम्प यांची बैठक सुरू झाल्यावर कळले की, ते आयात होणाऱ्या स्टीलवरील शुल्क वाढवू इच्छित आहेत. बैठक समाप्त होईपर्यंत सर्व सीईआे ट्रम्प यांच्या भूमिकेशी सहमत दिसले. बैठकीनंतर तत्काळ ट्रम्प यांनी माध्यमांना सांगितले की, आयात स्टीलवर २५% अतिरिक्त शुल्क लावण्यात येईल. अॅल्युमिनियमवर १०% शुल्कवाढ होणार आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, लोकांना याविषयी माहिती नाही की, अमेरिकेसोबत वाईट वर्तन होत आहे. आयात केलेल्या स्टीलमुळे आपल्या देशातील पोलाद उद्योग डबघाईला आला आहे. आम्ही त्याला गतवैभव प्राप्त करून देऊ.  


रिपब्लिकन सहकार्यांनी इशारा दिला की, अशा पावलांमुळे व्यापार युद्ध सुरू होईल. या सर्व इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून स्टील व अॅल्युमिनियमच्या आयातीवर नव्या शुल्कांची घोषणा करण्यात आली. ट्रम्प यांच्या बैठकीनंतर अमेरिकेत खळबळ माजली. शेअर बाजार घसरला. रिपब्लिकनने ट्रम्प यांना या घोषणेची फळे भोगावी लागतील असा इशारा दिला. सर्व टीकांना दुर्लक्षित करून दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रम्प यांनी सांगितले की, व्यापारी युद्ध चांगले असते. ते सहज जिंकता येते. येत्या १५ दिवसांत नवे शुल्क लागू केले जाईल. २००२ मध्ये असाच निर्णय तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी घेतला होता. त्यानंतर अमेरिकेत २ लाख नोकऱ्या गेल्या.  


या बैठकीनंतर भारतीय स्टील कंपन्यांनी चिंता व्यक्त केली आहे की, असे झाले तर जगातील अनेक स्टील निर्माता भारतात स्टील निर्यात करतील. ते अतिरिक्त असेल. इंडियन स्टील असोसिएशनने सांगितले की, यामुळे भारतीय बाजारावर विपरीत परिणाम होईल.  ट्रम्प यांच्या घोषणेचा संबंध २०१६ मधील मतदारांना दिलेल्या वचनाशी होता. उद्योग धोरणाविषयी व्हाइट हाऊसमध्ये नेहमी वाद झाले आहेत. ट्रम्प यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार व मुक्त बाजार धोरणाचे समर्थक गोल्डमन सॅकचे गॅरी कॉनने या घोषणेनंतर पदाचा राजीनामा दिला.  


कॉन यांनी राजीनामा दिल्यानंतर जगातील बाजारावर विपरीत परिणाम दिसला. कॉन यांना ट्रम्प यांच्या विजयाचे शिल्पकार मानले जाते. कर सुधारणांमध्ये त्यांचे योगदान होते. कॉन नेहमीच व्यापार युद्धाविरुद्ध आहेत. त्यांच्या राजीनाम्यानंतर ट्रम्प यांनी सांगितले की, ते लवकरच मुख्य आर्थिक सल्लागाराची नियुक्ती करतील. अनेक जणांना हे पद हवे आहे. पीटर नेवेरो यांच्या नियुक्तीची शक्यता सर्वाधिक आहे. पीटर त्यांच्या संरक्षणवादी दृष्टिकोनासाठी प्रसिद्ध आहेत. परंतु आत्तापर्यंत त्यांना रोखणारे कॉन ट्रम्प यांच्या चमूत होते. ट्रम्प व कॉन यांच्यादरम्यान अनेक मतभेद होते. ट्रम्प यांच्या बिझनेस करिअरमध्ये त्यांचे योगदान राहिले असल्याचे ट्रम्प त्यांचा आदर करत. कॉन यांच्या जागी इतर कोणी आल्यास ट्रम्प यांच्या धोरणाला ते रोखू शकतील, असे वाटत नाही. कॅपिटल हीलमध्ये सभागृह अध्यक्ष पॉल रेयान यांनीदेखील ट्रम्प यांच्या घोषणेवर पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे म्हटले. मात्र, कायद्यानुसार यासंबंधी सर्वाधिकार राष्ट्राध्यक्षांना आहेत.  


याच्या अंमलबजावणीविषयी आता उत्सुकता आहे. उद्योगांच्या बाबतीत ते दृढ आहेत. रिपब्लिकनांच्या धोरणांचे पालन करतात. ८० च्या दशकात ट्रम्प उद्योजक होते. तेव्हांपासून त्यांची तक्रार आहे की, चुकीच्या परदेशी स्पर्धांमुळे अमेरिकेशी दगाबाजी होत आहे.

 

राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रचाराच्या वेळीच त्यांनी स्पष्ट केले की, उद्योगाच्या बाबतीत कठोर पावले उचलतील. इतर रिपब्लिकन सदस्यांपेक्षा त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता. अमेरिकेला उत्पादनाचा बालेकिल्ला बनवण्यासाठी ते सरसावले आहेत. ट्रम्प यांच्या घोषणेचा निष्कर्ष  आता काळच समोर आणेल.  

 

दिग्गज कंपन्या झाल्या होत्या दिवाळखोर  

व्या  पारी युद्धाची सुरुवात २० व्या शतकात १९३० मध्ये झाली. तेव्हा स्मूट हेवले कर लादण्यात आला होता. २० हजार आयात वस्तूंवर जबर शुल्क लावण्यात आले. दुसऱ्या देशांनी याचे उत्तर दिले. यामुळे अमेरिकेची निर्यात ६१% घटली होती. १९३४ मध्ये हा कर हटवण्यात आला. १९ व्या शतकात व्यापार युद्धात कॅनडाचा फायदा झाला होता. त्यांना ब्रिटनचा बाजार निर्यातीसाठी मिळाला. अमेरिकेमध्ये जनरल मोटर्स व क्रिसलर दिवाळखोरीत निघण्याच्या मार्गावर होत्या.  

बातम्या आणखी आहेत...