आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील अलास्कात 8.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; सुनामीचा अलर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूकंपामुळे त्सुनामी उठण्याचा इशारा देण्यात आला आहे. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
भूकंपामुळे त्सुनामी उठण्याचा इशारा देण्यात आला आहे. (संग्रहित फोटो)

वॉशिंग्टन-  अमेरिकेतील अलास्काच्या सागरी किनारपट्टीवर मंगळवारी जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. अमेरिकेच्या भूगर्भ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 8.1 रिश्टर स्केलइतकी होती. या भूकंपामुळे सुनामी उठण्याचा इशारा देण्यात आला आहे. अलास्कातील चिनिएक शहरातील दक्षिणपूर्वेस 256 किलोमीटर अंतरावर या भूंकपाचा केंद्रबिंदू होता. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अलास्कात भूकंपाचे धक्के जाणवले. जमिनीच्या आत 10 किलोमीटर खोलवर भूकंपाची तीव्रता अधिक होती. सुनामीच्या इशाऱ्यानंतर अलास्कातील किनारपट्टीनजीकच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना त्वरित सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याची सूचना आपत्कालीन नियोजन विभागाकडून देण्यात आली आहे.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...