आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावडरने कॅन्सर : ग्राहकास 760 कोटींच्या भरपाईचे जॉन्सन अँड जॉन्सनला आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- बेबी केअर बाजारपेठेत जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या जॉन्सन अँड जॉन्सनला पुन्हा एकदा मोठा झटका बसला. एका अमेरिकी न्यायालयाने या कंपनीस ग्राहकाला ७६० कोटींची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. कनिष्ठ न्यायालयाने २४० कोटींची भरपाई देण्याचे आदेश दिले होते. वरिष्ठ न्यायालयाने ही भरपाई तिप्पट वाढवली. 


न्यूजर्सीतील ४६ वर्षीय बँकर स्टीफन लँजो व पत्नी कँड्रा यांनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरने मेसोथेलियोमा झाल्याचा दावा करून भरपाई मागितली होती. मेसोथेलियोगा हा एक प्रकारचा कॅन्सर असून तो पेशी, फुप्फुसे, पोट आणि हृदयासह इतर अवयवांसाठी घातक ठरतो. कंपनीच्या पावडरमध्ये अॅसबेस्टस असल्याने हा रोग झाल्याचे कंपनीच्या १२० वर्षांच्या इतिहासातील पहिला प्रकार आहे. या वर्षी जानेवारीत ही तक्रार दाखल करताना लँजोने आरोप केला होता की ३० वर्षांपासून या कंपनीची बेबी पावडर वापरत आहोत. यात अॅसबेस्टस असल्याने मेसोथेलियोगा झाला. कंपनीने आपल्या उत्पादनावर कोणत्याही आजाराविषयी इशारा दिलेला नाही. या आरोपाच्या प्रत्युत्तरात कंपनीने लँजोच्या घरात बेसमेंटमध्ये अॅसबेस्टस असल्याचे म्हटले होते. लँजो ज्या शाळेत शिकली तेथेही अॅसबेस्टस होते, असा कंपनीचा दावा होता. मात्र, हा युक्तिवाद कोर्टाने अमान्य करत भरपाईची रक्कम तिप्पट केली. यातील ७० टक्के जॉन्सन अँड जॉन्सन, तर ३० टक्के रक्कम ही पावडर पुरवणाऱ्या इमेरिज टाल्कने द्यावयाची आहे. 

 

कंपनीला २ वर्षांत ५,९५० कोटींचा दंड
गेल्या २ वर्षांत जॉन्सन अँड जॉन्सनच्या प्रकरणात ७ मोठे निकाल आले. यात कोर्टाने कंपनीला सुमारे ५,९५० कोटींचा दंड ठोठावला. तथापि, २,७००  कोटींच्या एका प्रकरणात निकाल कंपनीच्या बाजूने लागला. ऑगस्टमध्ये अलाबामाच्या एका महिलेला गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रकरणात  ४७५ कोटींची भरपाई द्यावी लागली. यानंतर मिसुरीच्या ५ प्रकरणांत कोर्टाने १,९९६ कोटींचा दंड ठोठावला होता.

बातम्या आणखी आहेत...