आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यूयाॅर्क - महिलेचे लैंगिक शोषणाच्या एका जुन्या प्रकरणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आता खटला चालणार आहे. न्यूयॉर्कच्या न्यायालयाने या प्रकरणात राष्ट्राध्यक्षांविरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. राष्ट्राध्यक्ष असले तरीही ते कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाहीत असेही कोर्टाने म्हटले आहे. 43 वर्षीय समर जेर्व्होस यांनी ट्रम्प विरोधात बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप लावला आहे. ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावणारी समर एकटी महिला नाही. त्यामुळे, मॅनहटन सुप्रीम कोर्ट जस्टिस जेनिफर शेक्टर यांनी दिलेल्या मंजुरीनंतर इतर महिलांनाही खटला चालवण्याचा मार्ग मोकळा झाला असे दिसून येते.
याप्रकरणी ट्रम्प यांच्या वकिलाने सध्याचे राष्ट्रपती राज्य न्यायालयाच्या न्यायिक अधिकार क्षेत्रात माेडत नसल्याचा युक्तिवाद केला हाेता; परंतु न्यायमूर्ती शेक्टर यांनी हा युक्तिवाद फेटाळून लावला. त्यांनी अमेरिकेच्या सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत पाउलाे जाेन्सचा माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्याविरुद्ध लैंगिक छळाचा खटला चालवण्यास परवानगी दिल्याचे सांगितले. अमेरिकेचे राष्ट्रपती स्वत:च्या खासगी जीवनातील घडामाेडींच्या पार्श्वभूमीवर कायद्याच्या चाैकटीत राहतात. ते कायद्यापेक्षा माेठे नाहीत. तसेच काेणीही कायद्यापेक्षा माेठा नाही. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रपतींनाही यातून सूट दिली जाणार नाही, हे निश्चित झाले अाहे, असे शेक्टर यांनी अापल्या निर्णयात म्हटले अाहे. ट्रम्प यांच्या कंपनीत काम केलेल्या जेर्वाेस यांनी २०१६ मध्ये राष्ट्रपती निवडणूक अभियानादरम्यान ट्रम्प यांच्यावर लैंगिक छळाचा अाराेप केला हाेता. जेर्वाेस यांच्या म्हणण्यानुसार २००७ मध्ये ट्रम्प यांनी त्यांची इच्छा नसताना वाईट हेतूने स्पर्श केला व चुंबनही घेतले. त्या वेळी जेर्वाेस या ट्रम्प यांचा रिअॅलिटी शाे ‘द अॅप्रेंटिस’च्या सल्लागार हाेत्या. मात्र, ट्रम्प यांनी जेर्वाेस यांच्यावर टीका करून त्यांना खाेटे ठरवले हाेते.
प्लेबॉय मॉडेलला ट्रम्प यांनी दिले आहेत ९७ लाख रुपये
न्यायालयात ट्रम्प यांच्या सेक्स स्कँडलची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनिअल्सच्या दाव्यानुसार, ट्रम्प यांनी २००६ मध्ये तिच्याशी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले होते. ट्रम्प यांनी डॅनिअल्सवर खटला दाखल केला आहे. डॅनिअल्ससोबत केलेल्या करारात हे प्रकरण जाहीर करणार नाही, अशी अट होती. करारानुसार तिला ९७ लाख रुपये दिले होते, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.