आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरिस हल्ल्याच्या संशयिताचा चौकशीस उत्तर देण्यास नकार; कोर्टही हतबल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रुसेल्स- २०१५ च्या पॅरिस हल्ल्यामध्ये जिवंत राहिलेल्या एकमेव संशयिताने ब्रुसेल्स येथे झालेल्या चौकशीस उत्तर देण्यास नकार दिला. सलेह अब्देसालेम याने पोलिसांवर बेछूट गोळीबार केला होता. त्या वेळी त्याला पकडण्यात यश आले. अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत २८ वर्षीय सलेहची चौकशी सुरू झाली. पॅरिसजवळील तुरुंगातून त्याला बेल्जियम येथे हलवण्यात आले. रात्रीतून त्याला कडक सुरक्षेत बेल्जियममध्ये आणले होते. अब्देसालेम मार्च २०१६ पासून कैदेत आहे. न्यायाधीशांनी त्याला चौकशीसाठी सहकार्य करण्यास सांगितले. मात्र त्याने चौकशीला काहीच प्रतिसाद दिला नाही.  


चौकशीच्या वेळी तो म्हणाला की, मला एकाही प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाही. न्या. मेरी फ्रान्स क्यूटगन यांनी त्याची आेळख विचारली. ब्रुसेल्समध्ये चार दिवस त्याची चौकशी सुरू होती. त्या वेळी त्याने आपली छायाचित्रे वा व्हिडिआे घेण्यासही नकार दिला. 

 
सलेह हा बेल्जियममध्ये जन्मला असून तो फ्रान्सचा नागरिक आहे. मोरोक्कनवंशीय सलेहने पोलिस अधिकाऱ्यांना दहशतवादी हल्ल्यात लक्ष्य केले होते. त्याच्याजवळ प्रतिबंधित शस्त्रांचा साठाही सापडला होता. १५ मार्च २०१६ रोजी ब्रुसेल्स येथे झालेल्या हल्ल्यापूर्वी ४ महिने पॅरिस हल्ला (१३ नोव्हेंबर २०१५)  झाला होता. या हल्ल्यात ३ पोलिस अधिकारी जखमी झाले होते. सलेहशिवाय सर्व जिहादी ठार करण्यात पोलिसांना यश आले होते. सलेहसोबतच २४ वर्षीय ट्युनेशियन नागरिक सोफिअन अयारीला (२४) अटक करण्यात आले होते. तो दोषी आढळल्यास त्याला ४० वर्षे कारावास होऊ शकतो.  

 

हेलिकॉप्टरद्वारे कोर्टावर निगराणी   
शेकडो बेल्जियन सुरक्षा रक्षकांच्या तैनातीमध्ये  सलेहला कोर्टात आणण्यात आले. या वेळी कोर्टाच्या वरती हेलिकॉप्टरची गस्त सुरू होती. सलेह येणार असल्याची बातमी गुप्त ठेवण्यात आली होती. एक सामान्य सुनावणी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. थोड्याही संशयावरून आपण कोर्टरूम  रिकामी करून घेऊ, असे सुरक्षा अधिकाऱ्याने स्पष्ट केले.  

 

पॅरिस हल्ल्यात १३० जणांचा गेला होता बळी 
१३ नोव्हेंबर २०१५ रोजी झालेल्या पॅरिस दहशतवादी हल्ल्यात १३० नागरिकांचा बळी गेला होता. या हल्ल्यानंतर एक महिन्याने ब्रुसेल्स येथेही आत्मघातकी हल्ला झाला. गेल्या दोन वर्षांपासून सलेहने चौकशीला काहीच प्रतिसाद दिलेला नाही. ब्रुसेल्स येथील चकमकीविषयी आपण बोलू, पॅरिस हल्ला किंवा आत्मघातकी हल्ल्यांविषयी नव्हे, असे न्यायमूर्तींनी म्हटल्यावरही सलेह काहीच बोलला नाही.  

 

गुन्हेगार असल्याने मौन आहे असे नाही : सलेह अब्देसलेम  

पॅरिस हल्ल्याचा संशयित सलेह अब्देसलेम याने  बेल्जियम कोर्टापुढे बोलताना म्हटले की, मी प्रश्नांना उत्तर देणार नाही. मौन राहिल्याने मी गुन्हेगार सिद्ध होत नाही. मुस्लिमांचा  निर्दयपणे न्याय केला गेला आहे. माझे मौन माझे संरक्षण आहे. मी अपराधी असल्याचे ते निदर्शक नव्हेच. ब्रुसेल्समधील चकमकीत तू का सहभागी झालास, याला मात्र त्याने काहीच उत्तर दिले नाही.

बातम्या आणखी आहेत...