आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संग्रहालयाने डोनाल्ड ट्रम्प यांना भेट दिले गोल्डन टॉयलेट; श्रीमंतांच्या छंदावर उपरोधाचे प्रतीक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- न्यूयॉर्कच्या गुगेनहाइम संग्रहालयाने अमेरिकी अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांना एक सोन्याचे टॉयलेट भेट म्हणून दिले आहे. ही आगळीवेगळी भेट ट्रम्प यांनी स्वीकारली किंवा नाही हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. वास्तविक ट्रम्प यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये संग्रहालयास पत्र पाठवून पेंटर वॅन गॉगने काढलेले ‘लँडस्केप विथ स्नो’ची मागणी केली होती. संग्रहालयातील सर्वात प्रसिद्ध पेंटिंगपैकी ते एक आहे. आता संग्रहालयाने ट्रम्प यांच्या पत्राला उत्तर देत पेंटिंग देण्यास नकार दिला आणि त्याऐवजी सोन्याचे एक टॉयलेट देण्याचा प्रस्ताव दिला. हे गोल्डन टॉयलेट १८ कॅरेट सोन्यापासून तयार केलेले आहे. व्हाइट हाऊसने याबाबत अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गुगेनहाइम संग्रहालयाच्या अध्यक्षा नॅन्सी स्पेक्टर यांनी व्हाइट हाऊसला पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, ‘लँडस्केप विथ स्नो’ पेंटिंग आम्ही तुम्हाला देऊ शकत नाहीत याबद्दल खेद आहे. काही विशेष कार्यक्रमांशिवाय आम्ही हे पेंटिंग संग्रहालयाबाहेर नेत नाहीत. त्याऐवजी आम्ही एक गोल्डन टॉयलेट भेट देऊ इच्छितो. इटलीचे कलाकार मॉरिटिज्यो कॅटेलॉन यांनी तयार केलेले हे गोल्डन टॉयलेट आम्ही व्हाइट हाऊसला दीर्घ काळासाठी देऊ शकतो.’ वेन गॉगने हे पेंटिंग १८८८ मध्ये काढले होते. ते संग्रहालयाच्या सहकारी संस्थानांत गेगनहाइमच्या मालकांच्या परवानगीनेच प्रदर्शित केले जाते. 


गोल्डन टॉयलेटकडे अमेरिकेतील श्रीमतांच्या एकूण महागड्या व अनावश्यक छंदांबाबत उपरोधाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. संग्रहालयाने या टॉयलेटचे नावही अमेरिका असेच ठेवले आहे. संग्रहालयात हे गोल्डन टॉयलेट चालू स्थितीत ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत अमेरिकेतील १ लाखाहून अधिक श्रीमंत लोकांनी या गोल्डन टॉयलेटचा वापर केला आहे. 

 

पुढील स्‍लाइउवर पाहा, लँडस्केप विथ स्नो पेंटिंग...

बातम्या आणखी आहेत...