आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर सुधारणेवर बोलणार होते ट्रम्‍प; पण भाषण कंटाळवाणे असल्याचे सांगून फेकला कागद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्निया - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देशातील कर सुधारणेवर भाषण देणार होते. कर सुधारणेसंबंधी एका गोलमेज चर्चेत त्यांना सहभागीही व्हायचे होते. यासाठी त्यांनी दोन पानांचे भाषण लिहून तयार केले. चर्चेवेळी ट्रम्प यांचा नंबर आला तेव्हा त्यांनी लिहिलेले भाषण हवेत उडवून देत, “भाषण वाचण्यासाठी मला दोन मिनिटांचा वेळ लागणार होता, पण हे खूपच कंटाळवाणे आहे’, असे म्हटले.

 

त्यांनी केलेल्या वर्तनावर उपस्थितांना हसू आवरले नाही. या प्रकारानंतर त्यांनी कर सुधारणेचा मुद्दा सोडून इतर बाबींवर बोलणे सुरू ठेवले. जवळपास २० मिनिटांपर्यंत त्यांनी निवडणूक, ड्रग माफिया, मेक्सिको आणि बोगस मतदार अशा अनेक मुद्द्यांवर आपले म्हणणे मांडले.  
ट्रम्प यांनी देशातील स्थलांतरित रहिवासी धोरणावर टीका केली. त्यांनी अमेरिकेतील जटिल स्थलांतरित धोरण आणि व्यापारी योजनांवर आपले मत व्यक्त केले. ट्रम्प यांनी अमेरिकेत एमएस-१३  सारख्या हिंसक टोळ्यांच्या उदयाशी स्थलांतरित रहिवासी धोरणाला जोडले. ते म्हणाले की, २०१६ च्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असून कॅलिफोर्नियातील कोट्यवधी लोकांनी अवैध पद्धतीने मतदान केले. कॅलिफोर्नियासारख्या अनेक जागांवर एकच जण अनेकदा मतदान करत होता. याबद्दल अनेकांना माहितीही असेल. बोगस मतदान करणारे या प्रकाराला कट रचण्याचा सिद्धांत म्हणतात.

 

बोगस मतदान करताना आपणाला कोणी पाहू नये, असे त्या लोकांना वाटत असते. राज्य सरकारजवळ अशा सर्व लोकांचे रेकॉर्ड आहे. अवैधरीत्या स्थलांतरित झालेल्या लोकांपासून होणाऱ्या धोक्याची कल्पना देत त्यांनी “एमएस-१३’ ला ठग संबोधले. “एमएस-१३’ वाईटाचे प्रतीक असून शेकडो जणांतून अशा लोकांना आपण शोधून काढत आहोत. देशात मूर्ख लोकांना येण्याची आपण परवानगी देत आहोत. परंतु आता असे करून चालणार नाही. मेक्सिकोतून अवैधरीत्या अमेरिकेत येणाऱ्या लोकांना त्यांनी दुष्कर्मी म्हटले. २०१५ मध्येही ते हेच बोलले होते. स्थलांतरित लोकांकडून धोका असल्याचे सांगून एका व्यक्तीची कथा सांगितली.

बातम्या आणखी आहेत...