आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रिटनच्या महाराणी सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर, मंत्र्यांनी घेतली शोकसभेची रंगीत तालीम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ब्रिटनमधील ९२ वर्षीय महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) सध्या आजारी आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुहे गेल्या आठवड्यात सेंट पॉल कॅथेड्रलमध्ये झालेल्या सेवा समारंभात त्या सहभागी होऊ शकल्या नाहीत. ब्रिटिश शाही कुटुंबाच्या प्रमुख असलेल्या महाराणींची प्रकृती चांगली राहावी म्हणून देश-विदेशात प्रार्थना सुरू असली तरी त्यांची सध्याची प्रकृती पाहता महाराणींच्या निधनानंतर आयोजित केल्या जाणाऱ्या शोकसभेसाठी सरकारमधील काही मंत्र्यांनी गुप्त पद्धतीने रंगीत तालीम केली, असा दावा 'द संडे टाइम्स'ने केला. 


टाइम्सने म्हटले आहे की, 'कॅसल डव्ह' नावाच्या या रंगीत तालमीत काही कॅबिनेट मंत्री आणि अधिकारी सहभागी होते. ब्रिटनच्या इतिहासात प्रथमच राजघराण्यातील सदस्याच्या मृत्यूपूर्वीच नेत्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जाणकारांच्या मते, सद्य:स्थितीत महाराणींचे निधन झाल्यास ही घटना ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात दु:खद असेल. महाराणींच्या निधनानंतर राजमहाल आणि सरकारकडून उचलल्या जाणाऱ्या पावलांची माहिती मागील वर्षी गार्डियन वृत्तपत्राने प्रसिद्ध केली होती. यानुसार १२ दिवसांपर्यंत शोक व्यक्त केला जाईल. यादरम्यान जीडीपीचे ५० हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान होऊ शकते. निधनानंतर कौन्सिलमध्ये सर्वात अगोदर राजघराण्याचा वारस कोण यावर चर्चा होईल. त्यानंतर बकिंगहॅम पॅलेसच्या दरवाजावर महाराणींच्या निधनाची सूचना लावली जाईल. जगभरातील प्रसिद्धिमाध्यमांसाठी ही बातमी जारी करून रेडिओ आणि टीव्ही स्टेशनच्या बॅकग्राउंडमध्ये शोकसंगीत वाजवण्यात येईल. 


सुपर सीनियर...महाराणींच्या कार्यकाळात १३ पंतप्रधान बदलले 
महाराणी एलिझाबेथ यांनी १९५२ मध्ये ब्रिटनची शाही गादी सांभाळली. त्यानंतर देशात १५ सरकारे आणि १३ पंतप्रधान बदलले आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून ६६ वर्षे पूर्ण झाली आहेत. १४०० गार्ड््स, २०० घोडे, ४०० म्युझिशियन आणि अमाप संपत्तीच्या बळावर महाराणी जगातील सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ठरतात. 

बातम्या आणखी आहेत...