आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकचा आणखी एका अॅनालिटिक्स कंपनीविरुद्ध तपास, तूर्त सेवा बंद करण्याचा निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - फेसबुकने डेटा अॅनालिटिक्स कंपनी क्रिम्सन हेक्सागॉनची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला असून कंपनीच्या विरोधात चाैकशीला सुरूवात केली आहे. यूजर्सचा डेटा चोरून त्याचा दुरूपयोग केल्याचा कंपनीवर ठपका आहे.

 

कंपनीच्या विरोधात फेसबुककडे अद्याप पुरावे उपलब्ध नाहीत. परंतु त्याचा गैरवापर झाल्याचा आरोप आहे. हेक्सागॉनच्या सोबत युजर्ससंबंधी काही करार झाले होते. या करारातील अटी-शर्तींचे कंपनीने उल्लंघन केले आहे का, याचा तपास केला जात आहे. आम्ही डेव्हलपर्सला फेसबुक किंवा इन्स्टाग्रामच्या डेटातून माहिती मिळवण्यासाठी सर्व्हिलान्स टूल्सचा वापर करण्याची परवानगी देऊ शकत नाहीत, असे फेसबुकच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. बोस्टनमधील क्रिम्सन हेक्सागॉन अनेक कंपन्यांना अॅनालिटिकल सेवा पुरवते. त्यात सरकारी संस्थांचाही समावेश आहे.

 

अनेक संस्थांशी करार
हेक्सागॉनचा रशिया व अमेरिकेच्या अनेक सरकारी संस्थाशी करार आहे. त्याशिवाय हेक्सागॉनचा अदिदास, सॅमसंग व बीबीसी सोबतही करार आहे. यूजर्सचा डेटा लीक करणे व त्याचा निवडणुकीत गैरवापर करण्यवरून फेसबुकने गेल्या काही दिवसांपूर्वी ब्रिटिश कंपनी अॅनालिटिकाची सेवा बंद होती.

 

पुढील वर्षी फेसबुकचा इंटरनेट उपग्रह
फेसबुक २०१९ मध्ये स्वत:चा इंटरनेट उपग्रह एथेना प्रक्षेपित करणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरू आहे. अद्यापही इंटरनेटपासून दूर असलेल्या कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचण्याचा फेसबुकचा उद्देश आहे. अमेरिकेच्या एफसीसीसमोर फेसबुकने या संबंधी निवदेनही दिले होते. त्यानुसार या प्रकल्पात जगभरात ब्राॅडबँड सेवा देण्याचा आराखडाही समाविष्ट आहे.

 

बातम्या आणखी आहेत...