आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समजत नव्हते कुत्र्याच्या विचित्र वागण्याचे कारण..लक्षात आले तर सर्वांनाच बसला धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार्ल्सटन - अमेरिकेत चार्ल्सटनमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने त्यांना बाळ झाल्यानंतर बाळाची काळजी घेण्यासाठी बेबी सीटर ठेवण्याचा विचार केला. त्यासाठी त्यांनी ज्या महिलेची निवड केली तिचे वय होते 22 वर्षे. तिच्याबाबत सर्व माहिती मिळवल्यानंतरच त्यांनी तिला नोकरी दिली. पण तिला कामावर ठेवल्यानंतर काही दिवसांतच त्यांच्या  पाळीव कुत्र्याच्या वागणुकीत बराच बदल झाला. या महिलेला पाहून तो कुत्रा खप भुंकायला लागायचा. 


कुत्रा देत होता संकेत... 
- बेंजामिन आणि होप जॉर्डन या जोडप्याबरोबर ही घटना घडली. त्यांनी 7 महिन्याच्या मुलाला सांभाळण्यासाठी आया कामावर ठेवली होती. 
- 22 वर्षे वय असलेल्या या आयाचे नाव होते अॅलेक्सिस खान. पण तिला कामावर ठेवल्यानंतर काही दिवसांत त्यांच्या कुत्र्याचा स्वभाव महिलेप्रती बदलायला लागला. 
- त्यांचा कुत्रा शक्यतो कोणावर चिडत नसायता. पण तो आयाला पाहताच भुंकायला सुरुवात करायचा. काही महिन्यांनी तर ती जवळ येताच कुत्रा भयंकर भुंकायचा. त्यानंतर या जोडप्याला भिती वाटू लागली. 


असे शोधले सत्य 
- कुत्र्याचा स्वभाव बदलल्यामुळे संशय आल्याने या जोडप्याने यामागचे कारण जाणून घेण्याचे ठरवले. त्यांनी घरातून जाताना घरात काय घडते हे जाणून घेण्यासाठी घरातील सोफ्यात फोन लपवला.  
- कामाहून परतल्यानंतर जेव्हा त्यांनी रेकॉर्डींग ऐकली त्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांना समजले की, त्यांची आया कुत्र्याबरोबर वाईट वर्तन करते. पण एवढेच नाही तर ती त्यांच्या मुलालाही खराब वागणूक द्यायची. 
- रेकॉर्डिंगमध्ये त्यांना मुलाचा रडण्याचा आवाज आला. पण आया त्याला शांत करण्याऐवजी त्याच्यावर ओरडत असल्याचे समजले. ती बाळावर ओरडत होती त्यांना शिव्या देत होती. 
- त्यांना तर रेकॉर्डींगमध्ये थापड मारण्याचा आवाजही ऐकायला आला. त्यानंर बाळ जोरात रडायला लागले. त्यानंतर बेंजामिन आणि होप यांनी बाळावर घरी होणाऱ्या अत्याचारांबाबत माहिती मिळाली.  


कुत्र्याचे आभार मानतात 
कुत्रा वारंवार बाळाला वाचवण्यासाठी संकेत देत होता हे समजल्यानंतर या जोडप्याचे कुत्र्यावरील प्रेम अधिक वाढले आहे. कुत्र्याचे आभार कसे मानायचे हेही जणून त्यांना समजेनासे झाले आहे. काळ्या रंगाचा हा कुत्रा लॅब्राडोर आणि  जर्मन शेफर्ड ब्रीडचे मिक्स अप होता. या प्रकारानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. अॅलेक्सिस खान हिने तिचा गुन्हा मान्य केला आणि तिला तीन वर्षांची शिक्षा झाली. 

बातम्या आणखी आहेत...