आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video Game खेळत होता मुलगा, बापाने गुडघ्याने गळा आवळून केला खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बस्ती - बिहारच्या बस्ती जिल्ह्यात एका बापाने आपल्या 12 वर्षीय मुलाला ठार मारले आहे. त्या मुलाची चूक फक्त इतकीच होती की तो व्हिडिओ गेम खेळत होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्षीय मुलगा राहुल शाळेतून परतल्यानंतर जवळच्याच एका दुकानात व्हिडिओ गेम खेळत होता. राहुलच्या वडिलांनी पाहताच त्याला आवाज दिले. वारंवार आवाज दिल्यानंतरही तो परतला नाही. यावर बाप इतका संतापला की त्याने आपल्या मुलाला बाहेर काढून घरी नेले. त्याच ठिकाणी त्याची निर्घृण हत्या केली. 


गुडघ्याने गळा दाबून केली हत्या
- राहुल त्या आरोपीच्या पहिल्या पत्नीचा मुलगा होता. त्याने सुरुवातीला राहुलला पकडून घरी नेले. यानंतर बेदम मारहाण केली. इतक्यातही तो थांबला नाही. आरोपीने आपल्या मुलाच्या गळ्यावर पाय ठेवला आणि गुडघ्याने त्याचा गळा आवळला. यात राहुलचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 
- हत्येचे प्रकरण दाबण्याच्या नादात आरोपीने आपल्या मुलाला फासावर लटकावले होते. तसेच गावकऱ्यांसमोर आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचे ढोंग करत होता. आत्महत्या समजूनच त्याचा मृतदेह पुरण्यातही आला होता. परंतु, आरोपीच्या पहिले सासरे आणि आजोबांनी पोलिसांत तक्रार केली. यानंतर मृतदेह पुन्हा बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले. त्यावरून आरोपीला अटक करण्यात आली. 


काय म्हणाला नराधम बाप...
पोलिसांनी शवविच्छेदनाच्या अहवालाचा दाखला देत आरोपी वडील शिवकुमार चौहानला अटक केली. यानंतर शिवकुमारने आपला गुन्हा कबूल केला. राहुलचे मन शिक्षणात लागत नव्हते. तो व्हिडिओ गेमच्या आहारी गेला होता. दिवसभर अभ्यास सोडून फक्त मोबाईल आणि व्हिडिओ गेम खेळत होता. वारंवार सांगूनही त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळेच त्याला बेदम मारहाण केली. असे आरोपीने पोलिसांना सांगितले आहे. 

बातम्या आणखी आहेत...