आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • चोराच्या अंत्ययात्रेत मर्सिडीझ अन् लिमोजिनचा ताफा, पाहतच राहिले अख्खे लंडन शहर Henry Vincent’S Funeral In London

चोराच्या अंत्ययात्रेत मर्सिडीझ अन् लिमोजिनचा ताफा, पाहतच राहिले अख्खे लंडन शहर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - श्रीमंतांच्या अंत्ययात्रा शाही थाटात झाल्याचे किस्से तुम्ही ऐकले असतील. आता आम्ही तुम्हाला लंडनच्या एका चोराच्या अंत्ययात्रेची भव्यता सांगत आहोत. हेनरी विन्सेंट नावाच्या मोस्ट वाँटेड चोराचा चोरी करतानाच मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीय आणि मित्रांना मोठा धक्का बसला. परंतु त्यांनी हेनरी शानदार निरोप दिला, जो अख्ख्या लंडन शहराने पाहिला. 

 

झोकात निघाली अंत्ययात्रा...
- हेनरी विन्सेंट साऊथ ईस्ट लंडनचा कुप्रसिद्ध मोस्ट वाँटेड होता. काही दिवसांपूर्वी त्याचा एका वृद्धाच्या घरात चोरी करताना मृत्यू झाला होता.
- 3 मे रोजी त्याचे मित्र आणि कुटुंबीयांनी त्याच्या अंत्ययात्रेत पाण्यासारखा पैसा खर्च केला.
- त्याच्या अंत्ययात्रेत 8 लांब मर्सिडीझ, लिमोजिन गाड्यांचा आलिशान ताफा पाहायला मिळाला. हा नजारा असा होता की, जणू काही एखाद्या हॉलीवूड सुपरस्टारला शेवटचा निरोप देण्यात येत आहे.
- हेनरी विन्सेंटच्या पूर्ण अंत्ययात्रेवर तब्बल एक कोटी रुपये खर्च करण्यात आले.
- त्यातील गाड्यांना फुलांनी सजवून त्यावर डॅडी, हेनरी आणि हीरो यासारखे अनेक शब्द लिहिण्यात आले होते.
- या हाइप्रोफाइल अंत्ययात्रेच्या सिक्युरिटीसाठी 50 पोलिस कर्मचारी कामावर लागले होते.
- याशिवाय आकाशातून 2 हेलिकॉप्टरही ताफ्यावर - अंत्ययात्रेवर नजर ठेवून होते. 
- ज्या घरात चोरी करताना हेनरीचा मृत्यू झाला होता, त्या वृद्धानेही चोरीची केस परत घेतली आहे.
- अंत्ययात्रा सुरू असताना हेनरीच्या कुटुंबाने आणि मित्रांनी पत्रकारांवर दगडफेक करून शिवीगाळ केली.
- पोलिसांनी दखल दिल्यावर प्रकरण शांत झाले. हेनरीला ऑर्प‍िंगटन कैंटमध्ये दफन करण्यात आले.

 

कोण होता हेनरी?
- हेनरी ड्रग अॅडिक्ट मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल होता. तो एका बँक लुटणाऱ्या टोळीचा मेंबर होता. यात त्याचे वडील आणि काकाही सामील होते. ही गँग लोकांचे अपहरण करून बँकेत न्यायची आणि बळजबरी पैसे हिसकावून घ्यायची.
- 2009 मध्ये हेनरीने एका व्यक्तीच्या घरातील एक टाइल्स बदलण्यासाठी लाखो रुपये चार्ज केले होत. तेव्हा त्याला 6 वर्षांची कैद झाली होती.
- यापूर्वीही त्याने 10 वर्षांची कैद भोगली होती. हेनरीच्या कुटुंबीयांनाही 29 वर्षांची कैदेची शिक्षा झालेली आहे. हेनरीचे वडील तब्बल 15 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...