आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट निर्माता वीनस्‍टीन राक्षस, माझे लैगिंक शोषण केले; हॉलिवूड अभिनेत्रीचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्निया- हॉलिवूड अभिनेत्री सलमा हायकने दिग्‍दर्शक-निर्माता हार्वे वीनस्‍टीनवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. सलमाने न्‍यूयॉर्क टाईम्‍समध्‍ये यासंबंधी लेख लिहून खुलासा केला आहे.  त्‍यामध्‍ये सलमाने म्‍हटले आहे की, 'हार्वेंना गुणवत्‍तेची परख आहे. मात्र ते एक राक्षसी व्‍यक्‍ती आहेत.'

 

आजही सांगताना लाज वाटते
- सलमाने न्‍यूयॉर्क टाईम्‍समध्‍ये लेख लिहून वीनस्‍टनवर आरोप केले आहेत.
- त्‍यामध्‍ये सलमाने म्‍हटले आहे की, 'माझ्यासोबत वीनस्‍टनने जे काही केले ते खूप भयानक होते. यातून सावरण्‍यासाठी मला खूप प्रयत्‍न करावे लागले. स्‍वत:चे ब्रेनवॉश करावे लागले.'
- 'या राक्षसाच्‍या झगमटामुळे कित्‍येक लोकांवर त्‍याचा प्रभाव पडतो. वीनस्‍टनने मला अनेक वर्षे त्रास दिला. माझ्या जीवनाच्‍या त्‍या क्षणांबद्दल सांगताना मला आजही लाज वाटते.', असे सलमाने म्‍हटले आहे.


अनेक महिलांसोबत दुष्‍कृत्‍य केले
- सलमाने लिहिले आहे की, 'मला वीनस्‍टनला माफ करण्‍याच्‍या माझ्या क्षमतेबद्दल गर्व होता. मात्र जेव्‍हा अनेक महिलांनी वीनस्‍टनच्‍या कृत्‍यांना वाचा फोडली तेव्‍हा मला माझ्या भित्रेपणाची जाणीव झाली. त्‍यानंतर वीनस्‍टनने माझ्यासोबत जे काही केले तेही जगासमोर आणण्‍याचे मी ठरवले.'
- 'माझ्यासोबत जे काही घडले ते समुद्रातील एका थेंबासमान आहे. मला वाटले होते की, क्‍वचितच कोणी माझ्या दु:खाला समजून घेऊ शकेल. मला त्‍या महिलांपासून हिंमत मिळाली ज्‍यांनी राष्‍ट्राध्‍यक्षांवरही शोषणाचे आरोप करण्‍याचे धाडस केले. यावरुन हेच सिद्ध होते की, शक्‍तीशाली व्‍यक्‍ती वाट्टेल ते करु शकतात.'

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...