आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर मेंदूसंबंधी रोग 42 % कमी, तर हृदयरोगाचा धोका 14% घटतो; लंडन येथील कॉलेजचे संशोधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- स्मृतिभंश, नैराश्य किंवा स्ट्रोक यांसारख्या मेंदूशी संबंधित आजारांचा धोका विवाहित लोकांत ४२ टक्के कमी होतो. शिवाय हृदयाशी संबंधित आजार, उदा. हार्टअटॅकसारखे धोकेही १४ टक्क्यांनी कमी होतात. वैवाहिक जीवन व त्यात तंदुरुस्त प्रकृतीविषयीचा हा संबंध ८ लोकांवर करण्यात आलेल्या संशोधनातून समोर आला आहे. लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजने हे संशोधन केले असून हा अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरने प्रसिद्ध केला आहे. या संशोधनात वेगवेगळ्या वयोगटातील विवाहित व अविवाहित लोकांचा समावेश करण्यात आला होता. यातील निष्कर्षानुसार, संतुलित जीवनमान व बळकट मानसिक स्थितीमुळे विवाहित लोक अविवाहित लोकांपेक्षा आपली प्रकृती चांगली ठेवू शकतात. वय वाढेल तसे एकटेपणा अनेक आजारांचे कारण ठरते. म्हणूनच विवाहित लोकांची मानसिक बळकट राहते आणि आजारांचा धोका कमी होतो.

 

विवाहित लोकांचे जीवन आजारापासून दूर तर ठेवतेच, शिवाय एखाद्या आजारातून सावरण्यासही मदत करते. तसेच, एखाद्या मोठ्या शस्त्रक्रियेतून लवकर सावरण्याची शक्यताही विवाहित लोकांत दुपटीने वाढते. हृदयविकारातून विवाहित लोक अविवाहितांपेक्षा दोन दिवस आधीच सावरतात. निष्कर्षांनुसार, विवाहानंतर लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी बदलतात. शिवाय, रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे वागणे बदलते. डॉक्टर लॉरा फिप्स सांगतात, या संशोधनात असे आढळून आले आहे की, वैवाहिक जीवनात दोघे जण परस्परांच्या प्रकृतीविषयी सतर्क आणि जागरूक असतात.

 

हृदयरोग व कॅन्सरमधून सावरण्यास मदतपूर्ण ठरते वैवाहिक जीवन, २५ हजार रुग्णांवर अभ्यास
हृदयविकार आणि कॅन्सरसारख्या आजारातून सावरण्यातही वैवाहिक जीवन फायद्याचे ठरते. अशा आजारांनंतर जिवंत राहण्याची शक्यता विवाहित लोकांत १४ टक्के अधिक असते. कारण, विवाहानंतर या व्यक्ती शारीरिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या सक्रिय असतात. २५ हजार रुग्णांवर हार्वर्ड हेल्थच्या मदतीने हे संशोधन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...