आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2017 मध्ये जितकी संपत्ती वाढली,तिचा 73% हिस्सा फक्त 1% श्रीमंतांकडे - ऑक्सफॅम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्सफर्ड- भारतात २०१७ मध्ये जितकी संपत्ती वाढली त्याचा ७३% हिस्सा देशाच्या १% श्रीमंतांकडे आला. आंतरराष्ट्रीय संस्था ऑक्सफॅमच्या ‘रिवॉर्ड वर्क, नॉट वेल्थ’ अहवालानुसार या १% श्रीमंतांच्या मालमत्तेत गतवर्षी २०.९ लाख कोटींची वाढ झाली. दुसरीकडे ६७ कोटी भारतीयांची संपत्ती गतवर्षी फक्त १% वाढली. गतवर्षी जगात वाढलेेल्या संपत्तीचा ८२% हिस्सा १% श्रीमंतांकडे आला. जगभरातील ३७० कोटी लाेकांची संपत्ती वाढली नाही. अहवालानुसार, वैश्विक अर्थव्यवस्थेने धनकुबेरांना प्रचंड मालमत्ता दिली आहे. याउलट दारिद्र्य रेषेखालील लाेक सरकारी योजनांच्या आधारे जगण्याचा संघर्ष करत आहेत.

 

> 10% श्रीमंतांकडे आहे देशाची एकूण  १०% मालमत्ता.

> भारताच्या एकूण मालमत्तेचा ५८% हिस्सा १% श्रीमंतांकडे.

> अब्जाधीशांची संपत्ती १३% दराने वाढतेय. कामगारांच्या पगारवाढीच्या दरापेक्षा हा वेग ६ पट अधिक आहे. 

> भारतात १० पैकी ९ अब्जाधीश पुरुष. ४ महिलाही अब्जाधीश.

 

एक कामगार ५० वर्षांत जितका पैसा कमावतो, तितका एक मॅनेजर १७.५ दिवसांतच मिळवतो
भारताच्या गावांत एक कामगार आयुष्यात (५० वर्षे काम) जितके कमावतो, तितका पैसा एखाद्या गारमेंट कंपनीचा मॅनेजर फक्त १७.५ दिवसांतच कमावतो. आॅक्सफॅम इंडियाच्या सीईओ निशा अग्रवाल म्हणाल्या, ही भयंकर आर्थिक असमानताच लाेकशाहीचा प्रभाव घटवून भ्रष्टाचाराला चालना देते.

 

गरिबांचे उत्पन्न २ हजार तर श्रीमंतांचे ४० हजार 
गतवर्षी भारताच्या एकूण संपत्तीचा ५८% हिस्सा १% लाेकांकडे होता. टॉप १०% श्रीमंतांकडे देशाची एकूण ८०% संपत्ती होती. १९८८ नंतर देशाच्या १०% गरिबांच्या उत्पन्नात दरवर्षी २ हजार रुपये तर १०% श्रीमंतांच्या उत्पन्नात वार्षिक ४० हजारांची वाढ झाली आहे. वर्षभरात १७ नवे अब्जाधीश झाले, आता एकूण १०१ आहेत.

बातम्या आणखी आहेत...