आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक अत्याचारांमुळे भारत अतिधाेकादायक राष्ट्र; अफगाणिस्तान व सिरियानंतर भारताचा क्रमांक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- अफगाणिस्तान व सिरियानंतर अाता भारत हा लैंगिक हिंसाचारामुळे महिलांसाठी धाेकादायक देश बनल्याचे एका पाहणीतून समाेर अाले अाहे. थाॅमसन रॉयटर्स फाउंडेशन या जागतिक संस्थेच्या तज्ज्ञांनी हे सर्वेक्षण केले असून, त्यात ही भीती व्यक्त करण्यात अाली अाहे. हा अहवाल मंगळवारी जाहीर करण्यात अाला. दरम्यान, अफगाणिस्तान व सिरियात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण माेठे अाहे. 


जगभरातील बहुतांश देशांमध्ये महिलांवर नेहमीच अत्याचाराच्या घटना घडत असतात. त्यात शारीरिक अत्याचार, मानसिक छळ, लैंगिक शाेषण, बलात्कार, काैटुंबिक हिंसाचार अादींचा समावेश असून, त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण हाेते. तसेच महिला-पुरुष समानतेच्या धाेरणालाही धक्का पाेहाेचताे. त्या पार्श्वभूमीवर भारतासह जगभरातील विविध देशांची सरकारे व समाजसेवी संघटनांकडून याबाबत जनजागृती करण्याचे प्रयत्न हाेत अाहेत; परंतु तरीदेखील महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत अाहे. त्यात भारतही मागे नसल्याची दु:खदायक स्थिती अाहे. संंबंधित संस्थेने महिलांच्या विविध अत्याचार प्रकरणांचा अभ्यास केला. या पाहणीत साेमालिया व साैदी अरेबिया अनुक्रमे चाैथ्या व पाचव्या क्रमांकावर अाहे. त्यात संस्थेच्या ५४८ तज्ज्ञांनी वैयक्तिकरीत्या अाॅनलाइन व फाेनद्वारे याबाबत माहिती मिळवली. हा सर्व्हे २६ मार्च ते ४ मेदरम्यान युरोप, अाफ्रिका, अमेरिका, दक्षिण-पूर्व अाशिया, दक्षिण अाशिया व प्रशांत महासागर क्षेत्रात करण्यात अाला. 


भारतातील स्थिती महिलांसाठी दु:खद 
या सर्वेक्षणात संयुक्त राष्ट्राच्या १९३मधील पाच सदस्य देशांपैकी काेणते देश महिलांसाठी अाराेग्य, अार्थिक साधने, सांस्कृतिक व पारंपरिक रूढी-परंपरा, लैंगिक हिंसाचार, छळ, मानव तस्करी अादीबाबत सर्वाधिक धाेकादायक अाहेत, असा प्रश्न सहभागी करण्यात अालेल्यांना विचारण्यात अाला हाेता. त्यात लैंगिक शाेषण व दास्यता, घरगुती हिंसाचार, मनाविरुद्ध वा दबावात विवाह करावा लागणे, पारंपरिक प्रथा, मानव तस्करीबाबत भारत हा महिलांसाठी सर्वात धाेकादायक देश असल्याचे उत्तर अनेकांनी दिल्याचे फाउंडेशनने अापल्या अहवालात स्पष्ट केले अाहे.

बातम्या आणखी आहेत...