आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील पहिले आण्विक ऊर्जेवरील विमान, लंडन ते न्यूयाॅर्क तीन तासांत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - आण्विक ऊर्जेवर चालणारे हे जगातील पहिले मॅग्नावेम विमान आहे. या विमानाचे डिझायनर ऑस्कर विनाल्स यांनी याची कन्सेप्ट डिझाइन तयार केली आहे. या विमानाची किमान गती सुमारे १८५० किमी प्रतितास राहील. म्हणजे लंडन ते न्यूयॉर्क पोहोचण्यासाठी केवळ तीन तास लागतील.

 

विशेष म्हणजे या विमानातून कार्बन उत्सर्जित होणार नसल्याने पर्यावरणाला नुकसान होणार नाही. विमानात लावण्यात आलेल्या कॉम्पॅक्ट फ्यूजन रिअॅक्टरमधून त्याला ऊर्जा मिळेल. लॅटिन भाषेतील ‘मॅग्ना एवम’ या शब्दातून या विमानाला नाव देण्यात आले आहे. याचा अर्थ मोठा पक्षी असा होतो. 

 

डिझाइनवर सुरू होते वर्षभर काम  
४० वर्षीय ऑस्कर जवळपास वर्षभरापासून या विमानाच्या डिझाइन वर काम करत होते. या विमानाचे तंत्रज्ञान अत्यंत प्रगत असल्याने ते तत्काळ रिचार्ज होईल. या तंत्रज्ञानावरील काम पहिल्या टप्प्यात आहे. विमानात “प्लाझ्मा अॅक्युटेटर्स’ आहेत, जे विमानाला तसेच पंखांवरील हवेला नियंत्रित करतील. त्यामुळे आकाशात हे विमान चांगले प्रदर्शन करू शकेल.

बातम्या आणखी आहेत...