आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटेलिजंट तंत्रज्ञान : कारशी गप्पा मारू शकता, बैठकीत रूपांतरित करू शकता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शांघाय - जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान प्रदर्शनात समावेश असलेल्या सीईएसच्या आशिया प्रदर्शनाला शांघायमध्ये सुरुवात झाली. यात आशियात होत असलेले इनोव्हेशन दाखवले जात आहे. १५ जूनपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ऑटो मोबाइल्समध्ये सेल्फ ड्रायव्हिंग व आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या इनोव्हेटिव्ह तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.आशियामध्ये या प्रदर्शनाचे चौथे वर्ष आहे. 

 
६ हजार वरिष्ठ अधिकारी : यंदा सुमारे ५०० कंपन्या सहभाग घेत आहेत. ८० देशांतील ५० हजार व्हिजिटर्स पोहोचले आहेत. ६००० पेक्षा जास्त बिझनेस प्रतिनिधी, ६००० वरिष्ठ अधिकारी तसेच धोरण बनवणाऱ्यांचा सहभाग आहे. १०० पेक्षा जास्त स्टार्टअप कंपन्याही आल्या आहेत. बंगळुरूची आल्गो अॅम्बेडेड सिस्टिम्स आणि सीएमएआय असोसिएशन्सदेखील यात सहभाग घेत आहेत.   

 

 

 

बातम्या आणखी आहेत...