आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या इतिहासात जिनपिंग सर्वात शक्तिशाली अध्यक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांची टिप्पणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन/बीजिंग - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची स्तुती केली आहे आणि जिनपिंग हे चीनच्या १०० वर्षांच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली अध्यक्ष असल्याची टिप्पणी केली आहे.  


फ्लोरिडात आयोजित एका कार्यक्रमात ट्रम्प म्हणाले की, ‘शी जिनपिंग आता आयुष्यभर अध्यक्षपदी राहू शकतील. तसा प्रस्ताव मंजूर करवून घेण्यात ते यशस्वी झाले आहेत.’ ट्रम्प यांनी जिनपिंग यांचे वर्णन ‘ए ग्रेट जंटलमन’ अशा शब्दांत केले.   


चीनमध्ये अध्यक्षपदावर दोन कार्यकाळापर्यंत राहता येत होते.चीनच्या सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने (सीपीसी) आता ही मुदत संपवण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यासाठी शनिवारपासून सुरू झालेल्या चीनच्या वार्षिक संसद अधिवेशनात घटनादुरुस्ती केली जाऊ शकते. तसे झाल्यास जिनपिंग २०२३ मध्ये तिसऱ्यांदा आणि त्यानंतरही अध्यक्षपदी राहू शकतात.  

 

‘दोन कार्यकाळांची मुदत हटवणे योग्य’

चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसचे प्रवक्ता झांग येसुई यांनी शी जिनपिंग यांना तिसऱ्यांदा अध्यक्षपदी कायम ठेवण्यासाठी घटनेतील दोन कार्यकाळांची मुदत संपवण्याच्या सीपीसीच्या प्रस्तावाचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की,‘ सीपीसी आणि देशाच्या एकतेसाठी जिनपिंग यांनी यापुढेही नेतृत्व देण्याचा निर्णय घेतला आहे.’

 

बातम्या आणखी आहेत...