आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावडरमुळे कॅन्सर होत असल्याच्या खटल्यात जॉन्सन अँड जॉन्सन दोषी; ३२ हजार कोटींचा दंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल इंघम - Divya Marathi
गेल इंघम

सेंट लुइस- 'जॉन्सन अँड जॉन्सन' बेबी पावडर वापरल्यानंतर कॅन्सर होतो, असा आरोप केला जात आहे. जगभरातील जवळपास ९ हजार महिलांनी कंपनीच्या विरोधात तक्रार केलेली होती. ६ आठवडे खटला चालल्यानंतर जॉन्सन अँड जॉन्सनला दोषी ठरवण्यात आले. अमेरिकेतील सेंट लुइस कोर्टाने कंपनीला ३२ हजार कोटींचा दंड ठोठावला आहे. कोर्टाने ९ हजार पैकी २२ महिलांचा दावा खरा असल्याचे मानत या महिलांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असे निर्देश दिले. 


महिलांच्या तक्रारीत म्हटले आहे की, तब्बल एक दशक बेबी पावडरचा वापर केल्याने ही बाब कॅन्सरसाठी कारणीभूत ठरली. तपासणी केली तेव्हा जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरमध्ये एसबेस्टसचे तुकडे आढळले. अशा स्थितीत दीर्घकाळापर्यंत पावडरचा वापर केला गेला तर यामुळे नुकसान होते. दरम्यान, निर्णयापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया बरोबर नव्हती. सर्व पुराव्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे जॉन्सन अँड जॉन्सनने म्हटले आहे. या निर्णयामुळे आम्ही निराश झाला असून याविरोधात दाद मागणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. 


या प्रकरणात कोर्टाने म्हटले की, "नामांकित कंपनी असल्याने जॉन्सन अँड जाॅन्सनने उत्पादनाची गुणवत्ता राखणे आवश्यक होते. पण कंपनीने गुणवत्तेकडे दुर्लक्ष तर केलेच, शिवाय ग्राहकांना धोक्याबाबत सतर्क केेले नाही.' पावडरमध्ये १९७० पासून अॅस्बेस्टाॅसचा वापर होत असल्याचे कोर्टात स्पष्ट झाले. पण २०१० मध्ये यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने पावडरच्या सँपलमध्ये अॅस्बेस्टॉस आढळले नाही. कोर्टाच्या मते, या संस्थेने केलेली तपासणीची पद्धत योग्य नव्हती. याआधीही जॉन्सन अँड जॉन्सन उत्पादनाच्या गुणवत्तेला अनुसरून ४ खटल्यात जवळपास २० अब्जचा दंड कंपनीला लागला आहे. 


२८ वर्षांच्या लढ्यानंतर ७३ वर्षांच्या इंघम यांना मिळाले यश 
कंपनीविरुद्ध मोहिमेची सुरूवात अमेरिकेतील महिला गेल इंघम यांनी केली. २ दशकांपर्यंत पावडर वापरल्यानंतर इंघम यांना १९८५ मध्ये कॅन्सर झाला. किमोथेरेपीनंतर १९९० मध्ये त्यांची प्रकृती सुधारली. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर इंघम यांनी पावडर कंपनीविरुद्ध खटला दाखल केला. यासंदर्भात इंघम म्हणाल्या की, 'तीन दशकांपूर्वी माझा आजार तर बरा झाला. आता पैसा माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. परंतु कॅन्सरसारख्या आजारामुळे महिलांना अनेक यातना सहन कराव्या लागतात. या निर्णयामुळे त्या सर्व महिलांना न्याय मिळाला.'

 

बातम्या आणखी आहेत...