आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्‍तर कोरियाला सर्वात मोठी अणुशक्‍ती बनवू इच्छितो हुकूमशहा; त्‍यांना युद्ध नव्‍हे तर चर्चा हवी- UN

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिऊल- आपल्‍याला उत्तर कोरियाला जगातील सर्वात मोठी अणुशक्‍ती बनवायचे आहे, असे उत्‍तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उनने म्‍हटले आहे. संहारक शस्‍त्रास्‍त्र आणि क्षेपणास्‍त्रांचे प्रक्षेपण करुन याचे संकेत त्‍यांनी यापूर्वीच दिले आहेत. दुसरीकडे उत्‍तर कोरियाच्‍या अधिका-यांच्‍या हवाल्‍याने संयुक्‍त राष्‍ट्राच्‍या राजदूत कार्यालयातर्फे सांगण्‍यात आले आहे की, उत्‍तर कोरियाला युद्ध नको आहे. मात्र आतापर्यंत त्‍यांच्‍याकडे चर्चेचा कोणताही ठोस प्रस्‍ताव पाठवण्‍यात आला नाही. नुकतेच उत्‍तर कोरियाने पुर्ण अमेरिकेला आपल्‍या टप्‍प्‍यात आणणा-या इंटरकॉन्‍टीनेंटल क्षेपणास्‍त्राची चाचणी केली आहे.  त्‍यामुळे उत्‍तर कोरियाचे दक्षिण कोरियासोबतच अमेरिकेशीही संबंध ताणले गेले आहे.


आम्‍ही जगात सर्वात शक्‍तीशाली
- नॉर्थ कोरियाच्‍या वृत्‍त संस्‍थेनूसार मंगळवारी एका कार्यक्रमात किम जोंग उन म्‍हणाले, कोणत्‍याही संकटाला सामोरे जाण्‍यासाठी आपला देश सज्‍ज झाला आहे. आपण प्रगत झालो आहोत. भविष्‍यात आपण जगातील सर्वात मोठी अणुशक्‍ती असू.  आपले लष्‍कर सर्वात सामर्थ्‍यशाली आहे.
- दुसरीकडे अमेरिकेचे विदेश मंत्री रॅक्‍स टिलरसन यांनी म्‍हटले आहे की, आम्‍हाला विश्‍वास वाटतो की,  उत्‍तर कोरियाला आपला अणुकार्यक्रम थांबवण्‍यासाठी त्‍यांच्‍यावर दबाव टाकण्‍यामध्‍ये आम्‍ही यशस्‍वी होऊ. पहिला अणुबॉम्‍ब पडण्‍यापूर्वी आपल्‍याला आवश्‍यक ते सर्व डिप्‍लोमॅटीक प्रयत्‍न करावे लागणार आहेत.
- त्‍याचसोबत अमेरिकेच्‍या विदेश मंत्र्यांनी एखादे संकट आलेच तर आपल्‍याला लष्‍करालाही सज्‍ज राहण्‍याचे आदेश दिले आहेत.


उत्‍तर कोरियाला चर्चेचा प्रस्‍ताव नाही
- संयुक्‍त राष्‍ट्राचे पॉलिटीकल अफेअर्स चीफ जेफरी फेल्‍टमॅन नुकतेच उत्‍त्‍र कोरियाच्‍या दौ-यावर गेले होते. 2011 नंतर प्रथमच संयुक्‍त राष्‍ट्राच्‍या एखाद्या मोठ्या अधिका-याने उत्‍तर कोरियाला भेट दिली. या भेटीमध्‍ये त्‍यांनी उत्‍तर कोरियाच्‍या परराष्‍ट्र मंत्र्याशी व काही प्रमुख नेत्‍यांसोबत चर्चा केली.  
- फेल्‍टमॅनने सांगितले की, ' या भेटीमध्‍ये उत्‍तर कोरियाच्‍या मंत्र्यांशी अतिशय गंभीरतेने चर्चा झाली. त्‍यांचेदेखील हेच म्‍हणणे आहे की, आम्‍हालाही युद्ध नकोच आहे. मात्र चर्चेचा कोणताही ठोस प्रस्‍ताव अद्याप आमच्‍याकडे आलेला नाही.'
- फेल्‍टमॅन पुढे म्‍हणाले की, 'उत्‍तर कोरियासेाबत चर्चेची आपण तयारी केली पाहिजे. यासाठी संयुक्‍त राष्‍ट्र मदत करु शकेल. या प्रक्रियेमधुनच पुढील मार्ग निघणार आहे.'

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, उत्तर कोरियाचे अमेरिकेविरुद्ध चलनयुद्ध; जगामध्ये प्रथमच आढळली बनावट सुपरनोट...

बातम्या आणखी आहेत...