आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरिया युद्धात दुरावलेल्या कुटुंबांची पुन्हा होणार भेट; ट्रम्प व जोंग भेटीचा परिणाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल- उत्तर कोरिया व दक्षिण कोरियाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ६५ वर्षांपूर्वीच्या कोरियातील युद्धात दुरावलेल्या कुटुंबांना आपल्या आप्तांच्या भेटीचा दुर्मिळ योग जुळवून आला आहे. उभय देशांनी त्यावर सहमती दर्शवली. शुक्रवारी युद्धग्रस्त कुटुंबांची भेट घडवण्यास दोन्ही देश राजी झाले. २०१५ नंतर अशा प्रकारची ही पहिलीच बैठक आहे. एप्रिलमध्ये किम जोंग व दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जेई-इन यांच्यात झालेल्या बैठकीत युद्धात होरपळलेल्या पीडित कुटुंबांची भेट घडवून आणण्यावर सहमती झाली होती. त्याच संदर्भात शुक्रवारी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांत चर्चा झाली. ही चर्चा कुमगांग रिसॉर्टवर आयोजित करण्यात आली होती. हा स्नेहसोहळा २० ऑगस्ट ते २६ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी १०० जणांची निवड झाली आहे. 


द.कोरियाकडून रेड क्रॉसमध्ये ५७ हजार लोकांची नोंदणी 
दोन्ही कोरियातील दुरावलेल्या कुटुंबांची ही स्नेहभेट माउंट कुमगांग येथील रिसोर्टवर आयोजित करण्यात आली आहे. द. कोरियन रेड क्रॉसकडे आतापर्यंत ५७ हजारावर लोकांनी भेटीसाठी नोंदणी केली आहे. त्यात बहुतांश ७० वर्षांहून जास्त वयाचे लोक आहेत. दुरावलेले कुटुंबातील सदस्य केवळ तीन दिवस सोबत राहू शकतील. 


युद्धात दोन्ही देशांचे लाखो लोक दुरावले होते 
१९५०-५३ दरम्यान दोन्ही कोरियांत तुंबळ युद्ध झाले होते. त्यात लाखो लोक दुरावले होते. त्यापैकी बहुतांश लोकांना सीमेवरूनच कुटुंबापासून दूर जावे लागले. त्यांची भेटही होऊ दिली गेली नाही. त्यांचे म्हणणे देखील ऐकले गेले नव्हते. युद्धानंतर सीमेच्या दोन्ही बाजूच्या लोकांना परस्पर व्यवहारावर बंदी होती. 


दोन्ही देशांत १८ वर्षांपूर्वी झाला होता असा मेळा 
उत्तर व दक्षिण कोरियामध्ये २००० मध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु तणाव वाढल्याने तो प्रत्यक्षात येऊ शकला नव्हता. दक्षिण कोरिया त्यांच्या नागरिकांना परत पाठवत नाही. तोपर्यंत स्नेहभेटीचे आयोजन होणार नाही, असा पवित्रा तेव्हा उ. कोरियाने घेतला होता. त्या अगोदर उत्तरेतील लोक मोठ्या संख्येने दक्षिणेत पळून गेले होते. 

बातम्या आणखी आहेत...