आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिएतनाममध्ये नवरदेव, पाहुणे भाड्याने घेऊन होत आहेत विवाह; नवरदेवाचे भाडे 1 लाख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हनोई- व्हिएतनाममध्ये लग्नासाठी नवरदेव आणि पाहुणे भाड्याने घेण्याचा व्यवसाय सुरू आहे. व्हिएतनाम हा परंपरावादी देश आहे. तेथील समाजात लग्नाशिवाय गर्भवती होणे आणि आई होणे हा कलंक मानला जातो. पण तेथे मोठ्या प्रमाणात मुली लग्नाशिवाय गर्भवती होण्याची प्रकरणे वाढली आहेत. अशा प्रकरणांत सामाजिक तिरस्कारापासून वाचण्यासाठी राजधानी हनोईसह संपूर्ण देशात बनावट लग्न करण्याचे प्रणाम वाढले आहे. इतरांना दाखवण्यासाठी लोक गर्भवती मुलींचा बनावट विवाह लावून देत असून नवरदेव तसेच पाहुणेही भाड्याने घेत आहेत. त्यासाठी ते मोठी रक्कम चुकवत आहेत. 


दोन दिवसांआधी असेच एक लग्न उघडकीस आले. २७ वर्षीय गर्भवती स्माइली खान (बदललेले नाव) नावाच्या युवतीने बनावट लग्न करण्यासाठी नवरदेवाला सुमारे एक लाख रुपये एवढी रक्कम दिली. विशेष म्हणजे बनावट नवरदेवाचे आधीच लग्न झाले होते. वधू पक्षाचे लोक आणि समाजाला हे लग्न खरे वाटावे म्हणून नवरदेशाशिवाय त्याचे आई-वडील, काका-काकू, नातेवाईक आणि मित्रांनाही बोलावले जाते. या नातेवाइकांना बोलावण्याचे भाडेही दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत असते. काही कंपन्या तर लग्नात नवरदेवासह संपूर्ण कुटुंबीय पाठवण्याचा व्यवसाय करत आहेत. एका लग्नात नवरदेव आणि नातेवाइकांना पाठवण्याच्या मोबदल्यात ४ लाख रुपये वसूल केले जात आहेत. कंपन्यांनी सांगितले की, लग्नात किमान २० जणांना भाड्याने बोलावले जाते. सामाजिक स्थान आणि आर्थिक संपन्नता या आधारावर ही संख्या ४०० च्या पुढेही जाते.

 

७० टक्के बनावट नवरदेव विवाहित, दरवर्षी होतात १००० बनावट विवाह
बनावट लग्न आणि भाड्याने पाहुणे बोलावण्याचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांचे म्हणणे आहे की, ७० टक्के विवाहात नवरदेव विवाहित असतात. एका अंदाजानुसार, देशात सुमारे १००० बनावट विवाह होत आहेत. हा आकडा दरवर्षी वाढतच आहे. व्हिएतनाममध्ये बनावट लग्नाचे मुख्य कारण म्हणजे वयातील अंतर हे आहे. ९.३ कोटी लोकसंख्येपैकी अर्ध्यापेक्षा जास्त लोक ३० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. अर्धी लोकसंख्या रूढीवादी विचार नाकारू शकत नाही.

 

बातम्या आणखी आहेत...