आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क- डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी आजच्याच दिवशी (20 जानेवारी) रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी शपथ घेतली होती. नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा धक्कादायकरित्या पराभव केला होता. ट्रम्प राष्ट्रध्यक्ष बनताच त्यांची तिसरी पत्नी मेलानिया या अमेरिकेच्या आगामी फर्स्ट लेडी बनल्या. अमेरिकेच्या बाहेरच्या फर्स्ट लेडी बनण्याचा मान मेलानियाा यांनी मिळाला आहे. व्यवसायाने एक सुपरमॉडेल असलेल्या मेलानिया यांनी पती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबतही अमेरिकन लोकांची खासकरून महिलांची माफी मागितली होती. 24 वर्षांनी लहान आहेत मेलानिया...
- व्यवसायाने लॉन्जरी मॉडेल राहिलेल्या मेलानिया, डोनाल्ड ट्रम् यांची तिसरी पत्नी आहे. त्या ट्रम्प यांच्यापेक्षा 24 वर्षानी लहान आहेत.
- मेलानिया यांची ट्रम्पसोबत पहिली भेट न्यूयॉर्कमध्ये वर्ष 1998 मध्ये एका फॅशन शो पार्टीत झाली होती.
- त्यांच्या रिलेशिनशिपला 1999 मध्ये आलेल्या एका इंटरव्यूनंतर पब्लिसिटी मिळत गेली.
- वर्ष 2004 मध्ये दोघांचा साखरपुडा झाला आणि रिलेशनशिप जगासमोर आले.
- यानंतर 22 जानेवारी 2005 रोजी दोघांनी लग्न केले. त्यांना आता 10 वर्षाचा एक मुलगा आहे.
16 व्या वर्षी सुरु केले होते मॉडेलिंग-
- 47 वर्षाच्या मेलानिया मूळच्या यूगोस्लाविया देशातील आहेत. त्यांची आई सुद्धा फॅशन बिजनेसमध्ये होती.
- मेलानिया यांनी वयाच्या सोळाव्या वर्षीच मॉडेलिंगची सुरुवात केली होती.
- वयाच्या 17 व्या वर्षी मेलानिया यांनी हेल्मुट न्यूटन, पॅट्रिक डेमार्केलिय अशा अनेक मोठ्या फोटोग्राफरबरोबर काम केले.
- वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी मिलानमधील एका मॉडेलिंग एजन्सीबरोबर काम सुरू केले होते.
- ल्युबलाना विद्यापीठातून डिझाइन आणि आर्किटेक्चरमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर मेलानिया यांनी मिलानमधील काही मोठ्या फॅशन हाऊसेससाठी काम केले.
- त्या इंग्रजी, फ्रेंच, स्लोवानियन, सर्बियन आणि जर्मन भाषा चांगल्याप्रकारे बोलू शकतात. 1996 मध्ये त्या न्यूयॉर्क शहरामध्ये स्थायिक झाल्या.
- ब्रिटिश GQ मॅगझीनच्या फ्रंट पेजसाठी मेलानिया यांनी ट्रम्प यांच्या बोईंग 727 मध्येच न्यूड पोज दिली होती.
- मेलानिया आता ज्वेलरी बिजनेस चालवतात आणि आपला प्रोडक्ट शॉपिंग चॅनेल QVC वर विकतात.
पतीच्या कारनाम्यामुळे मागितली होती माफी-
- अमेरिकेतील निवडणुकीदरम्यान मेलानिया यांनी म्हटले होते की, माझ्या पतीने ज्या शब्दाचा वापर केला ते धक्कादायक आणि अस्वीकार्य आहेत. हे शब्द त्या व्यक्तीचे नाहीत ज्याला मी माझे मानते.
- त्या पुढे म्हणाल्या होत्या की, ‘ट्रम्प यांचा ह्दय आणि मेंदू दोन्हीही नेता बनण्यासाठी उत्तम आहे.
- मी आशा व्यक्त करते की, लोक त्यांना माफ करतील. मला विश्वास आहे की, ट्रम्प नेहमीच त्या मुद्यांवर लक्ष देतील जे अमेरिका व अमेरिकन नागरिकांच्या हिताचे असतील.'
पुढे स्लाईड्सद्वारे वाचा, डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया यांची लव्हस्टोरी....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.