आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या आक्रमकतेला उत्तर देण्यास मॉस्को तयार, घोषणेने धाेका वाढला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्लोरिडावर अण्वस्त्रांचा मारा दाखवत व्हिडिओ सिम्युलेशनसमोर उभे राहून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी घोषणा केली की, अमेरिकेच्या आक्रमकतेला उत्तर देण्यास मॉस्को तयार आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिकी संरक्षण कवच निरर्थक करणारी इतर चार अण्वस्त्रेही तयार होत आहेत. ट्रम्प यांच्या स्टेट ऑफ द युनियन या भाषणाला हे उत्तर आहे.

 

त्यात त्यांनी अमेरिकी अण्वस्त्रे ‘आधुनिक’ करण्याचे आव्हान केले होते. पुतीन यांच्या घोषणेची वाईट वेळ यापेक्षा दुसरी कोणती होऊ शकत नव्हती. दोन्ही देश सिरिया आणि पूर्व युरोपच्या अनेक अस्थिर भागांत आमनेसामने आहेत. तेथे धोक्याच्या चुकीच्या आकलनाचा परिणाम थेट संघर्षांत होऊ शकतो. मे २०१६ पर्यंत युरोपमध्ये नाटो दलांचे कमांडर राहिलेले हवाई दलाचे जनरल फिलीप ब्रीडलव्ह यांनी सांगितले की, आता स्थिती बिघडण्याच्या संधी वाढत आहेत. शीतयुद्ध काळात दोन्ही देशांत अशा अनेक संधी होत्या, पण चुकीचा परिणाम काढण्यात आला नाही आणि चर्चेची दारे नेहमी खुली राहिली. युरोपमध्ये परंपरागत शस्त्रास्त्रांचा करार, खोल समुद्र आणि त्यावरील घटनांवर बंदी, धोकादायक लष्करी कारवाया रोखणारे करार अशा अनेक करारांना आता काही महत्त्व नाही.  


रशियाने २०१६ च्या अमेरिकी निवडणुकीत अनेक स्तरावर हस्तक्षेप केल्याची बातमी अमेरिकी गुप्तचर संस्थांना लागल्यापासून रशिया आणि अमेरिका यांच्यातील संवाद सीमित झाला आहे. २०१४ मध्ये क्रिमियावरील रशियाच्या ताब्यानंतर अमेरिकी काँग्रेसने नॅशनल डिफेन्स अॅथॉरायझेशन अॅक्टअंतर्गत एक तरतूद केली आहे, त्यानुसार रशियासोबत एकत्र काम करण्याची अमेरिकी संरक्षण मंत्रालयाची क्षमता सीमित झाली आहे. त्यामुळे शांततेसाठी धोका वाढला आहे. 

बातम्या आणखी आहेत...