आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूून जाए इन यांचा ‘मी-टू’ अभियानात सहभाग; दक्षिण काेरियात अभियानाला सर्व क्षेत्रातील महिलांचा प्रतिसाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल- दक्षिण काेरियातही ‘मी-टू’ अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, देशात या अभियानाला पाठिंबा देणाऱ्या समर्थकांची संख्या दिवसेंदिवस वाढत अाहे. त्यातच अाता दक्षिण काेरियाच्या राष्ट्रपतींनी या अभियानात सहभाग घेतला अाहे. देशातील कला व मनाेरंजन उद्याेगातील काही माेठ्या व प्रभावशाली व्यक्तींनी महिला कलाकारांचे लैंगिक शाेषण केल्याचा अाराेप करत त्यांनी या अभियानास अापण समर्थन देत असल्याचे घाेषित केले.  


राष्ट्रपती मून जाए इन यांनी साेमवारी सेऊल येथे त्यांच्या सल्लागारांची बैठक घेतली. त्यात ते बाेलत हाेते. लैंगिक शाेषण वा छेडछाडीला बळी पडलेल्यांविषयी मला सहानुभूती अाहे. अशा व्यक्ती अाता धैर्याने पुढे येऊन अापल्यावरील अन्यायाबाबत सांगत अाहेत. तसेच दाेषींवर कारवाई करण्याची मागणीही करत अाहेत. त्यामुळे अशा प्रकारांची चाैकशी करण्यात येणार अाहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. संस्कृती व दृष्टिकाेन बदलल्यास अशा प्रवृत्तींना उखडून फेकले जाऊ शकते व या अभियानामुळे असे घडण्यास मदत मिळेल, असा अाशावादही त्यांनी व्यक्त केला.  
परंपरावादी द. काेरियात काही अाठवड्यांपूर्वी अनेक महिलांनी कला, साहित्य, धर्म व मनाेरंजनाच्या क्षेत्रातील कित्येक नामांकित व्यक्तींनी महिला कलाकारांचे लैंगिक शाेषण केल्याचा अाराेप केला हाेता. शाेषण झालेल्या महिलांची संख्या माेठी असल्याचा अाराेपही त्या महिलांनी केला हाेता. त्यात देशातील नॅशनल थिएटर अाॅफ काेरियाचा माजी कला संचालक व रंगमंच कलाकारांचा अादर्श मानण्यात येणारा ली यून-तायेक व अनेक चित्रपटांत मुख्य भूमिका साकारणारा चाे जा-ह्यून अादींचा समावेश अाहे. यासह किम कि-ड्यूक या चित्रपट दिग्दर्शकावरही महिला कलाकारांचे लैंगिक शाेषण केल्याचा अाराेप हाेत अाहे. महिला कलाकारांना सेटवर अमानवी वागणूक देणे, शिवीगाळ करणे, अपमान करणे, अकारण त्रास देणे अादी अाराेप ड्यूकवर करण्यात अाले अाहेत. याशिवाय एका महिला वकिलानेही वरिष्ठ वकिलाने अापल्याशी अनैतिक वर्तणूक केल्याचा अाराेप एका टीव्ही वाहिनीवरील मुलाखतीत केला हाेता. त्या पार्श्वभूमीवर देशात ‘मी-टू’ अभियानाने जाेर पकडला असून, अभियानास पाठिंबा वाढत अाहे.  

 

अभियानामुळे पुढे येऊ लागल्या महिला  
दक्षिण काेरियात या अभियानामुळे लैंगिक शाेषण झालेल्या इतर महिला व महिला कलाकार अाता निर्भयपणे पुढे येत अाहेत. या अभियानामुळे त्यांना माेठी हिंमत मिळाली असून, अापल्यावरील अन्यायााबाबत त्या सार्वजनिकरीत्या बाेलत अाहेत. परिणामी या अभियानाला समर्थन देणाऱ्यांची संख्या वाढत अाहे. त्यातच अाता देशाच्या राष्ट्रपतींनी पुढाकार घेतल्याने अनेक उच्चपदस्थ व्यक्तींनाही प्राेत्साहन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त हाेत अाहे.

बातम्या आणखी आहेत...