आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायलंडच्या ज्या गुहेतून मुले बाहेर काढली, तेथे संग्रहालय होणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थायलंड- थायलंडच्या थाम लुआन गुहेतून फुटबॉल संघातील सर्व खेळाडूंची यशस्वी सुटका झाल्यानंतर सरकारने तेथे संग्रहालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सुटका करण्यात आलेली सर्व १२ मुले आणि त्यांचे प्रशिक्षक या सर्वांची प्रकृती चांगली आहे. या घटनेवरून ४०० कोटी रुपये खर्चून हॉलीवूडचा चित्रपट तयार करण्यात येणार आहे. गुरुवारी प्रथमच गुहेच्या आतील बचावकार्याचे चित्रीकरण व्हायरल झाले . यात ११ ते १६ वर्षांच्या मुलांना स्ट्रेचरवरून सुरक्षित बाहेर नेताना दिसते. या अवघड मोहिमेतून मुलांना सुरक्षितपणे बाहेर नेण्यासाठी बेशुद्ध केले होते. 


प्रथमच व्हायरल झालेले छायाचित्र, बचाव उपकरणे संग्रहालयात 
पाण्याने भरलेल्या गुहेतून १६ वर्षांखालील थाई फुटबॉल संघास बाहेर काढणाऱ्या बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी तेथील जागेची स्वच्छता सुरू केली आहे. कारण त्यांच्या धाडसी मोहिमेची आठवण म्हणून त्या जागेवर संग्रहालय उभारले जाईल. बचाव पथकाचे प्रमुख नारोंगसाक ओसोट््नकॉर्न यांनी म्हटले, हे स्थान आता संग्रहालयात रूपांतरित होणार आहे. या मोहिमेतील कपडे व उपकरणे संग्रहालयात असतील. 

बातम्या आणखी आहेत...