आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाजपेयींशी झालेल्या चर्चेची मोदींनी दिली अाठवण; माेदी व पुतीन यांच्यात पहिली अनाैपचारिक चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेची (रशिया) -  रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र माेदी हे साेमवारी रशियाच्या दाैऱ्यावर गेले. त्यात माेदींनी काळ्या समुद्रकिनाऱ्यावरील साेची शहरात पुतीन यांच्याशी पहिली अनाैपचारिक शिखर चर्चा केली. माेदींनी चाैथ्यांदा रशियाचे राष्ट्रपती बनलेल्या पुतीन यांना शुभेच्छा दिल्या. तसेच पुतीन यांना त्यांचा पहिला भारत दाैरा व तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भेटीची अाठवणही करून दिली. माेदी म्हणाले, सन २००० मध्ये पदभार सांभाळल्यापासून तुमचे भारताशी अतूट नाते आहे.

 

पहिल्यांदा रशियाचे अध्यक्ष झाल्यानंतर तुम्ही भारतात अाला हाेता. त्या वेळी अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान हाेते. त्या दाैऱ्यात तुम्ही भारताचा एक ‘जिवंत लाेकशाही’ म्हणून गाैरव केला हाेता. त्यामुळे भारताचे नागरिक अाजही तुमची अाठवण काढतात. भारत व रशिया हे खूप जुने मित्र असून, दाेन्ही देशांत अतूट नाते अाहे. त्यामुळे भारत व रशियात असलेली रणनीतिक भागीदारी अाता विशेषाधिकारप्राप्त झालेली भागीदारी बनली अाहे.  


मोदींनी रशियात निमंत्रण दिल्याबद्दल पुतीन यांचे आभार मानले. त्यावर पुतीन म्हणाले की, ‘तुमचा दाैरा द्विपक्षीय संबंध अाणखी मजबूत करेल. रशिया व भारत हे अांतरराष्ट्रीय स्तरावर अनेक बाबींत एकमेकांना सहकार्य करत आहेत.’

 

अायएनएससीटी, ब्रिक्समध्ये साेबत काम करताहेत भारत आणि रशिया
माेदी म्हणाले की, अाम्ही अांतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक प्रकल्प (अायएनएससीटी) व ब्रिक्सवर एकत्रित काम करत अाहाेत. शांघाय सहकार्य संघटनेत स्थायी सदस्यत्व मिळवून देण्यात भारताला मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल माेदींनी रशियाचे अाभार मानले. अाठ राष्ट्रांच्या या संघटनेचा हेतू सदस्य देशांत सैन्य व अार्थिक सहकार्य वाढवणे, हा अाहे. भारत व पाकिस्तानचा यात गतवर्षी समावेश करण्यात अाला हाेता. पंतप्रधान झाल्यापासून माेदींचा हा चाैथा रशिया दाैरा अाहे.  

 

२४ दिवसांत दुसऱ्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा 
ही पंतप्रधान माेदींची एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांशी झालेली ही दुसरी अनाैपचारिक चर्चा. २४ दिवसांपूर्वी माेदी चीनच्या दाेनदिवसीय दाैऱ्यावर गेले हाेते. तेथे त्यांनी अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी पहिली अनाैपचारिक चर्चा केली हाेती.  

 

चर्चेच्या वातावरणासाठी अनाैपचारिक भेट  
अनाैपचारिक चर्चा समझाेता वा कराराचा भाग नसते; परंतु यातून चर्चेसाठी वातावरणनिर्मिती हाेत असते. भारत  दीर्घ काळापासून रशियापासून दूर राहिला अाहे. भारत जितका अमेरिकेजवळ गेला तितका रशियापासून दुरावला. त्यामुळे दाेन्ही देशांत संतुलन निर्माण करण्यासाठी अनाैपचारिक चर्चा करणे माेदींना जास्त याेग्य वाटत अाहे. त्यात मुद्दे निश्चित नसतात. जेव्हा संबंधित राष्ट्रांचे प्रमुख भेटतात, तेव्हा चर्चेचे वातावरण निर्माण हाेते.   

 

१८ वर्षांपासून दरवर्षी हाेतेय शिखर चर्चा  
भारत हा रशियाचा सर्वात माेठा शस्त्र खरेदी करणारा देश असून, गरजेची ६८ % शस्त्रे रशियाकडूनच घेताे. त्यामुळेच भारत व रशियात रणनीतिक भागीदारी मजबूत हाेत अाहे. दाेन्ही देशांत गेल्या १८ वर्षांपासून शिखर चर्चा हाेत असून, त्याची सुरुवात सन २००० मध्ये नवी दिल्लीत रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या पहिल्या दाैऱ्याने झाली हाेती. तेव्हापासून एक वर्ष भारतात व एक वर्ष रशियात अशी चर्चा होत आहे.  

 

सिरियस एज्युकेशनल सेंटरला माेदींची भेट  
माेदींनी रशियातील सिरियस एज्युकेशनल सेंटरलाही भेट दिली. या केंद्रात बालवयातच मुलांच्या बुद्धिमत्तेला पैलू पाडण्याचे काम केले जाते. तेथे कला, खेळ व नैसर्गिक विज्ञानापासून तंत्रज्ञान सर्जनशीलतेवर विशेष काम केले जाते. हे काम १०० शिक्षक व प्रशिक्षकांच्या माध्यमातून हाेते. १० ते १७ वर्षे वयाेगटातील ६०० मुले दर महिन्यात या केंद्रात येतात. त्यांना येथे काैशल्य विकसित करण्याचे शिक्षण माेफत देण्यात येते. 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...