आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताशी संबंध सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न हवे; माजी राजदूत वर्मांनी व्यक्त केले मत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क -  पाकिस्तानातील राजकीय नेत्यांचा सीमेवरील कारवायांसाठी दहशतवाद्यांना सातत्याने पाठिंबा असतो. त्यामुळेच सीमेवरील कारवाया सुरूच असतात. भारताच्या दृष्टीने पाकिस्तानची ही नीती कदापिही शाश्वत असू शकत नाही, असे अमेरिकेचे माजी राजदूत रिचर्ड वर्मा यांनी म्हटले आहे. पाकिस्तानातील सामान्य नागरिकांना भारतासोबतचे संबंध चांगले हवे आहेत. त्यांना आपल्या कुटुंबीयांच्या भविष्याची काळजी वाटते. परंतु पाकिस्तानातील नेत्यांना सामान्य जनतेच्या भावनांशी काही देणे-घेणे असल्याचे वाटत नाही, अशी टीका वर्मा यांनी केली.

 

‘न्यू इंडिया लेक्चर’ या भारताच्या वाणिज्यदूत कार्यालयाच्या वतीने आयाेजित व्याख्यानात वर्मा यांनी आपले विचार मांडले. सध्याची परिस्थिती वाईट आहे. आर्थिक व राजकीय व्यवस्थेचा शस्त्र म्हणून वापर केला जात आहे, असे त्यांनी सांगितले.  पाकिस्तानातील नेते आर्थिक-राजकीय परिस्थितीचा शस्त्र म्हणून वापर करू लागले आहेत. दहशतवाद्यांना सातत्याने पाठिंबा देण्याचे त्याचे धोरण घातक आहे. 


आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा विचार केल्यास चीनची सागरी प्रकल्पांची योजना चिंता निर्माण करणारी आहे. कारण चीन आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करण्यात आतापर्यंत अयशस्वी ठरले आहे. 

बातम्या आणखी आहेत...