आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपनीय व्यवस्था कोलमडली! घरगुती हिंसाचाराच्या एका घटनेमुळे बिंग फुटले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेसा बेरेसन- दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेच्या वरिष्ठ गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी कॅपिटल हिलमध्ये अमेरिकी नागरिकांना संबोधित करतात. जगातील मोठ्या धोक्यांविषयी जागृत करण्यासाठी सार्वजनिक स्वरूपात काही बाबी सांगितल्या जातात. यावर्षी त्यांनी सांगितले की, व्हाइट हाऊसच्या पश्चिमेकडे २ मैलांवर असलेल्या पेनसिल्व्हेनियातून धोका संभवतो. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी येऊन १३ महिने झाले आहेत. त्यांचे अनेक सल्लागार अद्यापही अस्थायी सुरक्षा परवान्याखाली काम करत आहेत. म्हणजेच देशातील केवळ दोन वरिष्ठ सहकाऱ्यांनाच देशातील अति गोपनीय मुद्द्यांची माहिती आहे. यापैकी रॉब पोर्टर हे एक आहेत. ७ फेब्रुवारी रोजी त्यांनीही घरगुती हिंसाचाराचा आरोपामुळे राजीनामा दिला. त्यांनी या आरोपाची अद्याप कबुली दिलेली नाही.  


राष्ट्रीय गुप्तचर निर्देशक डेन कोट्स यांचे म्हणणे आहे की, ट्रम्प यांचा  गुप्तहेरप्रमुखच सध्या संकटात अडकला आहे. १३ फेब्रुवारी रोजी काँग्रेसमध्ये त्यांनी याचा खुलासा केला. सरकारच्या अंतर्गत सुरक्षेसाठी काम करणाऱ्या लोकांच्या स्वीकृतीच्या संबंधात कोट्स यांचे म्हणणे आहे की, माहिती कोणती आहे, कोणाला द्यायची, कोणाला नाही इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. सध्या स्थिती खराब आहे. ट्रम्प यांचे एफबीआय निर्देशक क्रिस रे यांनी यात भरच टाकली आहे. त्यांनी काँग्रेसच्या याच समितीसमोर म्हटले की, व्हाइट हाऊसला अनेक महिन्यांपासून पोर्टर यांच्या समस्येविषयी माहिती होती. क्रिस रे यांनी सांगितले की, एफबीआयने गेल्या वर्षी मार्च, जुलै आणि नोव्हेंबर महिन्यांत पोर्टरच्या स्थितीविषयी संपर्क केला होता. त्यानंतर यावर्षी जानेवारीत विचारणा केली होती. एजन्सीने पोर्टर यांच्यासंबंधी काम पूर्ण केले होते.  


ट्रम्प यांचे चीफ ऑफ स्टाफ जॉन केली यांनी पोर्टरच्या चारित्र्याविषयी चांगले मत मांडले आहे. या खुलाशानंतर आता त्यांनाही हटवण्याचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. हाऊस आेव्हरसाइट कमिटीने यानंतर घोषणा केली की, ते याप्रकरणी चौकशी करतील. त्यानंतर सुरक्षेची मंजुरी निश्चित करणाऱ्या कौन्सिलच्या प्रमुखांनीच पदाचा राजीनामा दिला. या प्रकरणात, राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी असलेल्या प्रशासनाची अक्षम्य बेपर्वाईच समोर येत आहे. 


घरगुती हिंसाचाराच्या आरोपांची पार्श्वभूमी असल्याने त्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत पद स्वीकारता येणार नाही. पोर्टर अद्यापही अंतरिम सुरक्षा संमतीनेच काम करत होते.   
याचाच अर्थ ट्रम्प यांच्याकडे जाणारा प्रत्येक कागद त्यांच्या निगराणीखाली होता. यामध्ये ट्रम्प यांचे जावई  व वरिष्ठ सल्लागार जरेड कुशनरदेखील आहेत. राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या प्रत्येक गोपनीय अहवाल सादरीकरणावेळी कुशनर उपस्थित असतात. ते पूर्वी सर्वात प्रमुख सल्लागार मानले जात. त्यांच्यानंतर रॉब पोर्टर यांचे स्थान होते.  


पोर्टर यांच्याविषयी वाद निर्माण झाल्यानंतर व्हाइट हाऊसने दिलेल्या उत्तरामुळे स्थिती आणखी बिघडली आहे. एकानंतर एक अधिकारी सुरक्षा परवानगीसाठी अपात्र ठरत आहेत. कारण दररोज ट्रम्प प्रशासनामध्ये नवनवे चेहरे सामील होत आहेत. ८ फेब्रुवारी रोजी उपमाध्यम सचिव राज शहा नियुक्त झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...