आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराढाका- देशातील आयआयटीसारख्या मोठ्या संस्थांमध्ये तयार होणारे व्यावसायिक शिक्षण घेतल्यानंतर बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सेल्समन बनतात, असे मत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले. बांगलादेशमधील चटगाव विद्यापीठातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांना मानद डॉक्टर ऑफ लेटर्स (डी.लिट.) पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. उच्च शिक्षणात संशोधनाची गरज आहे. दक्षिण आशियातील विद्यापीठांनी आपल्या लक्ष्याचे पुनरावलोकन करण्याची आवश्यकता असल्याचे मुखर्जी म्हणाले. बुधवारी बांगलादेशचा चारदिवसीय दौरा पूर्ण झाला. या वेळी त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले. ते त्यांच्याच शब्दांत...
नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या भारतीयांनी परदेशी संस्थांमध्ये शिक्षण घेतले
नालंदा आणि तक्षशिलासारखी विद्यापीठे एका चुंबकाप्रमाणे काम करत होती. जगातील बुद्धिमान लोक या संस्थांकडे आकर्षित होत होते. तेथील शिक्षणाचा स्तर उंचावलेला होता. हळूहळू येथील शिक्षणाचा स्तर घटत गेला. अमर्त्य सेन, सी.व्ही. रमण आणि हरगोविंद खुराणांसारख्या भारतीयांना संशोधनासाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परंतु त्यांनी भारतात नव्हे तर हार्वर्डसारख्या परदेशी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतले.
सद्य:स्थितीत आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्था उत्तम व्यावसायिकांना तयार करत आहेत. परंतु राष्ट्रनिर्माणात योगदान देण्याऐवजी ते बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सेल्समनचे काम करत आहेत. हे सर्व व्यावसायिक आपली क्षमता आणि बुद्धीवर अन्याय करत आहेत. कारण कमी प्रतिभा असलेले लोकही तेच काम करू शकतात. आता उच्च शिक्षणात संशोधनावर भर द्यावा लागेल. विशेषत: दक्षिण आशियातील विद्यापीठांनी त्यांच्या लक्ष्याचे पुनरावलोकन करण्याची गरज आहे. अर्थमंत्रिपदावर असताना मी शिक्षण, संशोधनासाठी निधी उपलब्ध केला. परंतु संस्थांच्या कामगिरीचा आढावा घेता आला नाही. राष्ट्रपती झाल्यावर मात्र यावर मी लक्ष केंद्रित केले. कारण त्या वेळी १०० पेक्षा अधिक विद्यापीठांचा मी प्रमुख होतो. स्वातंत्र्याच्या केवळ साडेतीन वर्षांत बांगलादेशात बंग बंधू शेख मुजीबूर रहमान यांची हत्या केली गेली, तर भारतात महात्मा गांधी मारले गेले. पाकिस्तानने लियाकत अली खान आणि झुल्फिकार अली भुत्तो यांचा मृत्यू पाहिला, तर म्यानमारमध्ये आँग सान आणि श्रीलंकेत राणासिंघे प्रेमदासा यांना संपवण्यात आले. या हत्यांमुळे दक्षिण आशियात लोकशाहीला मोठा धक्का पोहोचला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.