आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा परिषदेच्या चर्चेत पाकची कुरापत, हेरगिरीचा केला आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्ट्र- पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत शनिवारी चर्चेदरम्यान कुलभूषण जाधव प्रकरण उपस्थित केले. पाकिस्तान दहशवाद्यांसाठी नंदनवन बनले आहे, असा आरोप भारत, अमेरिका, अफगाणिस्तान यांनी केल्यानंतर पाकिस्तानने ही कुरापत काढली. त्याचबरोबर भारतावर हेरगिरीचा आरोप केला. 


भारताचे प्रतिनिधी सईद अकबरुद्दीन यांच्या प्रश्नावर पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी मलिहा लोढी यांनी हे उत्तर दिले. वास्तविक अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानला कडक शब्दांत खडसावले. पाकिस्तानने आपली मानसिकता बदलली पाहिजे. दहशतवादी चांगला किंवा वाईट नसतो. पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी नंदनवन ठरू लागला आहे. हे वास्तव आहे. ते नाकारता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. लोढी म्हणाल्या, आम्हाला मानसिकता बदलण्याचा सल्ला देण्यापूर्वी भारताने स्वत:कडे अगोदर पाहिले पाहिजे. माझ्या देशाच्या विरोधात हेरगिरी करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. हा भारतीय हेर आहे.  तत्पूर्वी, अमेरिकेच्या प्रतिनिधींनी पाकिस्तानला इशारा दिला. पाकिस्तानात दहशतवादी संघटनांना सातत्याने आश्रय मिळू लागला आहे.

बातम्या आणखी आहेत...