आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीफ यांनी मोदींना घरी बोलावले, पण भारताचे धोरण एकटे पाडणारे : इम्रान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानच्या निवडणुकीत भारताची चर्चा रंगू लागली आहे. इम्रान खान यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील बिघडलेल्या संबंधासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरले आहे. इम्रानने पहिल्यांदाच आपले प्रतिस्पर्धी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा बचाव करताना देश व जनतेच्या समस्या जाणून घेणे हे पंतप्रधानांचे कर्तव्य असल्याचे सांगितले. शरीफ यांनी या पातळीवर उत्कृष्ट काम केले. त्यांनी भारत-पाकिस्तानचे संबंध सुधारण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. त्याचे संपूर्ण श्रेय मी त्यांना देईन, असा उमाळा इम्रानला आला आहे. परंतु मोदी सरकारच्या आक्रमक धोरणामुळे उभय देशांतील संबंधात कटुता आली आहे, असा आरोप इम्रानने केला आहे. ते म्हणाले, शरीफ यांनी संबंध सुधारण्यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न केले. परंतु मोदी सरकारने पाकिस्तानला वेगळे पाडण्याचे नीती अवलंबिली. पाकिस्तानबाबतचे त्यांचे वागणे आक्रमक दिसून आले. कारण मोदींना काश्मीरमधील हिंसाचाराचे खापर पाकिस्तानवर फोडायचे होते, असा आरोप त्यांनी केला. पाकिस्तानात निवडणुकीस आणखी तीन आठवडे बाकी आहेत. २५ जुलैला मतदान होईल. 


शरीफ कुटुंबाबत निर्णय आज 
पाकिस्तानचे एक न्यायालय बेनामी संपत्तीच्या प्रकरणात शरीफ कुटुंबाबाबतचा निर्णय शुक्रवारी जाहीर करणार आहे. लंडनमध्ये शरीफ अवेनफील्ड संपत्ती प्रकरणात नवाझ शरीफ, त्यांची मुलगी मरियम नवाझ व जावई कॅप्टन मोहंमद सफदर (निवृत्त) आरोपी आहेत. सध्या शरीफ कुटुंब लंडनमध्ये आहे. या प्रकरणात मरियमला दोषी ठरवण्यात आल्यास त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येऊ शकते. मरियम लाहोरमधून निवडणूक लढवत आहे. लंडनच्या अवेनफील्ड हाऊसमध्ये शरीफ यांचे चार अपार्टमेंट आहेत. भ्रष्टाचाराच्या पैशांतून ही माया जमवल्याचा आरोप आहे. 

 

जलदगती सुनावणीला सुरुवात 
पाकिस्तानात सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयास शरीफ यांच्या विरोधातील खटल्याचा तत्काळ निपटारा करण्याचे आदेश दिले आहेत. ही सर्व प्रकरणे आठवडाभरात निकाली काढण्यात यावीत, असे स्पष्ट केले आहे. 


पाहणीत इम्रान खानच किंग मेकर 
दोन पाहण्यांतून नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एनला सत्ता सोडावी लागेल. पीटीआयला लोकांची पसंती आहे. कोणत्याही पक्षाला ३० टक्क्यांहून जास्त मते नाहीत. पल्स कन्सल्टंटच्या सर्व्हेनुसार पीटीआयला ३० टक्के, पीएमएल-एनला २७ टक्के मते मिळणे शक्य. 


पाक मीडियानुसार निवडणुकीनंतर पीटीआय व पीएमएल-एन एकत्र येत सत्ता स्थापन करणे शक्य 
पाकिस्तानच्या शक्तिशाली लष्कराने नेहमीच देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. पाकिस्तानच्या ७० वर्षांच्या इतिहासात पाकिस्तानच्या राजकारणावर लष्करी प्रभाव राहिलेला आहे. कारण आमचे राजकीय सरकार कमकुवत राहिले. त्यामुळे आमच्या राजकीय दिशा चुकत गेल्या. तेथे एक प्रकारची पोकळी बनली आहे. ती भरून काढावी लागेल, असे इम्रान म्हणाले. 

 

इम्रान यांची लोकप्रियता वाढली 
गॅलपच्या पाहणीत पीएमएल-एनला २६ टक्के, तर पीटीआयला २५ टक्के मतांाची शक्यता. इम्रानची लोकप्रियता ८ टक्क्यांनी वाढली. पाहण्यांत पीटीआयला खैबर पख्तुनख्वामध्ये ५० टक्क्यांहून जास्त मिळण्याची चिन्हे. 

बातम्या आणखी आहेत...