आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फक्त 350 रुपये कमावत होता हा भारतीय, इंग्लंडमध्ये उभा केला कोट्यवधींचा उद्योग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - खिशात मोजके पैसे घेऊन महानगरात नशीब आजमावण्यासाठी आलेल्यांच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या आणि वाचल्या असतील. मात्र हा भारतीय तरुण त्याने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही मोजके पैसे घेऊन सातासमुद्रापार गेला आणि स्वप्न सत्यात उतरवले. रुपेश थॉमस आज इंग्लंडमध्ये साडे 18 कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक आहे. त्याचा चहाचा बिझनेस आहे. त्याचे प्रॉडक्ट इंग्लंडमधील प्रसिद्ध स्टोअर हार्वे निकोल्समध्ये सप्लाय होत आहे. 

 

- इंग्रजांनी भारतीयांना चहाचे वेड लावले असे थट्टेने म्हटले जाते. या भारतीयाने त्याच चहाचा इंग्लंडमध्ये कोट्यवधींचा उद्योग उभा केला. 

- कधीकाळी 350 रुपये कमावणारा 39 वर्षांचा रुपेश साऊथ वेस्ट लंडनमधील विम्बल्डनमध्ये 9 कोटींच्या बंगल्यात राहात आहे. तर, त्याचे सेकंड होम साऊथ लंडनमधील क्रेडॉन येथे 3 कोटी रुपयांचे आहे. 
- रुपेशच्या टुक टुक चहा उद्योगाने 18 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. इंग्लंडमधील लक्झरी स्टोअरमध्ये त्याची चहा विक्रीसाठी उपलब्ध आहे. 

कुठे झाला जन्म 
- केरळमध्ये जन्मलेल्या रुपेशला नेहमीच इंग्लंडला जाण्याची इच्छा होती. इंग्लंडने त्याच्या मनात घर केले होते. तिथे जाऊन करिअर करावे असे त्याने फार आधीच ठरवून टाकले होते. 
- त्याने सांगितले, की माझे वडील कामानिमित्त ट्रॅव्हल करायचे. त्यांच्याकडे लंडनचा एक फोटो होता. तो फोटो पाहिल्यानंतर ते ठिकाण याची देही याची डोळा पाहावे असे वाटत होते. 
- जेव्हा करिअर करण्याची वेळ आणि चांगले आयुष्य कसे जगता येईल याचा विचार सुरु झाला तेव्हा माझ्यासमोर एकच पर्याय दिसत होता, तो म्हणजे इंग्लंड. 

 

असे पूर्ण केले स्वप्न 
- रुपेश 23 वर्षांचा होता तेव्हा त्याने त्याची यामहा बाइक 23 हजारात विकली. त्यासोबतच वडिलांकडून काही पैसे घेतले आणि 2002 मध्ये लंडनला पोहोचला. 
- रुपेश थॉमस लंडनमधील स्ट्रेटफोर्ड येथे पोहोचला अणि पहिल्या दिवसापासून त्याने कामाला सुरुवात केली. तेथील मॅक्डोनाल्डमध्ये त्याने नोकरी सुरु केली. तिथे त्याला एका तासाचे 350 रुपये मिळत होते. 
- त्याने सांगितले, की तिथे फार मेहनतीचे काम होते. मात्र मी हसतहसत ते करत होतो. मी संपूर्ण बिझनेस पाहात होतो. मला काय करता येईल याचा विचार करत होतो.
- रुपेशने सांगितले, की मॅकडीमध्ये काही आठवडे जॉब केल्यानंतर त्याला केअररची नोकरी मिळाली. त्यानंतर 2003 मध्ये त्याने डोअर-टू-डोअर जाऊन सेल्समॅनेचे काम केले. 
- त्यानंतर लवकरच तो कंपनीचा बेस्ट सेलर झाला आणि त्याचे प्रमोशन टीम लिडर म्हणून झाले. या कामाच्या ठिकाणी त्याची ओळख एलेक्झांड्रासोबत झाली. आता ती त्याची पत्नी आहे. 
- या दोघांची भेट झाल्यानंतर 2007 मध्ये त्यांनी लग्न केले. लग्नाचा सोहळा फ्रान्स आणि भारतातील केरळ या दोन्ही ठिकाणी झाला. 
- 2009 मध्ये त्यांनी विम्बल्डन टेनिस ग्राऊंडजवर एक मिड टेरेस घर खरेदी केले. 

 

अशी सुचली बिझनेस आयडिया 
- रुपेशने सांगितले की सेल्समॅनची नोकरी ही दगदगीची आणि कष्टाची होती. मात्र त्याकाळात पैशांची मोठी निकड असल्यामुळे काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. 
- रुपेशची सेल्स कॅपिसिटी पाहून त्याला एका मोबाइल कंपनीत जॉब मिळाला. येथेही त्याने खूप मेहनत केली. 
- रुपेशने सांगितले की बिझनेसची आयडिया 2007 मध्ये तो आणि त्याची पत्नी भारतात आले होते तेव्हा सुचली. अॅलेक्झांड्राला भारतीय चहा फार आवडली. दोघे भारतात होते तेव्हा दिवसभरात 10-10 कप चहा पित होते. 
- यूकेमध्ये परत गेल्यानंतरही चहाचे वेड कायम राहिले. मात्र या चहात साखर जास्त आणि ही चहा पत्तीने तयार झालेली नसायची. येथेच बिझेनसची आयडिया सुचली. 

 

सेव्हिंग्सच्या माध्यमातून उभा केला बिझेनेस 
- 2015 मध्ये रुपेश थॉमसने उद्योग उभा करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने बँकेतील ठेव काढली. तेव्हा त्याच्याकडे दीड लाख रुपये होते. तेवढ्याच पैशात त्याने उद्योग सुरु केला आणि त्या उद्योगाने त्याला चांगला नफा देखील मिळवून दिला. 
- रुपेश म्हणाला मी एक जुगार खेळला होता. मला वाटले की येथे चहाचे मोठे मार्केट आहे. माझा हा जुगार काम करुन गेला. 
- रुपेशने अभिमानाने सांगितले, की गेल्या वर्षी मार्चमध्ये इंग्लंडमधील प्रसिद्ध स्टोअर हार्वे निकोल्सलाही आमचे प्रॉडक्ट खूप आवडले. त्यांनी त्यांच्या सात स्टोअरमध्ये आमचे उत्पादन ठेवले आहे. 
- या स्टोअरमध्ये प्रॉडक्ट आल्यामुळे मोठ्या वर्गापर्यंत प्रॉडक्ट पोहचू शकले. 
- आपल्या या यशाचे रहस्य सांगताना रुपेश म्हणाला, मी सिद्ध केले आहे की कठोर मेहनतीशिवाय तुम्हाला यश मिळत नाही. मी खऱ्या आयुष्यातील स्लमडॉग मिलेनिअर आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, रुपेश आणि त्याच्या आलिशान आयुष्याचे फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...