आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेलसिंकी शिखर चर्चा : चार तासांमध्ये दोन्ही देशांतील नाते बदलून गेले : डोनाल्ड ट्रम्प

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेलसिंकी- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात सोमवारी फिनलंडची राजधानी हेलसिंकीत प्रथमच द्विपक्षीय चर्चा झाली. ट्रम्प म्हणाले की, आम्ही व्यापार, लष्कर, क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे आणि चीन या मुद्द्यांवर चर्चा केली. या वेळी ट्रम्प यांनी केवळ चार तासांत दोन्ही देशांतील नाते बदलून गेल्याची भावना व्यक्त केली. ट्रम्प म्हणाले, अध्यक्ष होऊन मला दोन वर्षे झाली आहेत. आमच्या संबंधांना भविष्यात नवे आयाम मिळतील. आम्ही जगातील सर्वात मोठे अण्वस्त्रधारी देश आहोत. आमच्याकडे ९०% अण्वस्त्रे आहेत. ही चांगली गोष्ट नाही. मी वैयक्तिक चर्चेसाठी तयार आहे. दुसरीकडे, पुतीन यांनी ट्रम्प यांना चांगले संबंध ठेवण्याचा विश्वास दिला. ते म्हणाले की, मी ट्रम्प यांना भेटून उत्साहित आहे. आम्ही दूरध्वनीवरून सतत संपर्कात आहोत. 


हेलसिंकीची निवड का?  
ट्रम्प-पुतीन यांच्यात हेलसिंकीच्या प्रेसिडेन्शियल पॅलेसमध्ये  शिखर चर्चा झाली. फिनलंड ‘नाटो’चा सदस्य नाही. रशिया नाटो देशांना शत्रू मानतो. १९९५ मध्ये फिनलंड युरोपीय संघात सहभागी झाला होता, पण लष्करी आघाडीत सहभागी नाही. त्यामुळे दोघांसाठी हेलसिंकी निष्पक्ष जागा आहे. मॉस्कोपासून हेलसिंकीला विमानाने २ तासांतच जाता येते.  


ट्रम्प यांचे ट्विट : अमेरिकेच्या मूर्खपणामुळे तणाव होता  
ट्रम्प यांनी पुतीन यांच्या भेटीपूर्वी ट्विट करून लिहिले की, रशियाशी खराब संबंधांसाठी अमेरिकेतील मागील सरकारे आणि नेते जबाबदार आहेत. मागील सरकारांच्या मूर्खपणामुळेच आमचे संबंध चांगले राहिले नाहीत. त्यांनी निवडणुकीत रशियाच्या कथित हस्तक्षेपाची निष्पक्ष चौकशी न झाल्याबद्दलही टीका केली. 


बंदद्वार चर्चेचे कारण : उभयतांमधील संवेदनशील चर्चेचा तपशील फुटू नये  
ट्रम्प- पुतीन या दोघांतच ९० मिनिटे चर्चा झाली. तेव्हा त्यांच्यासोबत फक्त एक महिला दुभाषी होती. ट्रम्प यांनी अधिकाऱ्यांना सांगितले होते की, संवेदनशील मुद्द्यांवरील चर्चा बाहेर येऊ नये म्हणून मला पुतीन यांच्याशी बंदद्वार चर्चा करायची आहे. ट्रम्प यांच्या मते, फक्त नेत्यांमधील चर्चेमुळे परस्पर संबंध आणखी मजबूत होतात. ट्रम्प यांनी सिंगापूरमध्ये उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्याशीही एकट्याने चर्चा केली होती. 

बातम्या आणखी आहेत...