आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: रशियातील हे गाव वसलेय शेवटच्या टोकावर, राहतात अवघे 12 लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूक्रेनच्या बॉर्डरवर वसलेले कलाच गाव.... - Divya Marathi
यूक्रेनच्या बॉर्डरवर वसलेले कलाच गाव....

इंटरनॅशनल डेस्क- यूक्रेनच्या बॉर्डरवर असलेले रशियातील 'कलाच' या गावाची रशियातील सर्वात कमी लोकसंख्येचे गाव ठरले आहे. येथे फक्त 12 लोक राहतात आणि हे सर्व जण तरूण आहेत. गावात राहणारे सर्व लोक नोकरी करतात आणि येकातेरिनबर्ग सिटीत नोकरी करतात. त्यांच्यासाठी रोज सकाळ-संध्याकाळ येते एक बोगीची ट्रेन...

 

- सेव्हियत यूनियनच्या काळात या गावाची लोकसंख्या 3 हजाराच्या आसपास होती. त्या काळी यूक्रेन सुद्धा सेव्हियतचा भाग होता.
- वर्ष 1992 मध्ये जेव्हा सेव्हियत यूनियनचे विघटन झाले तेव्हा यूक्रेन वेगळा देश बनला आणि हे गाव यूक्रेनच्या सीमेवरील रशियातील शेवटचे गाव ठरले. 
- या गावातूनच रशियाची रेल्वे लाईन संपते. विशेष म्हणजे आताही येथून रोज सकाळी आणि संध्याकाळी एक ट्रेन धावते. 
- गावात राहणा-या लोकांना शहरात जाण्यासाठी तो एकमेव पर्याय आहे. तो भाग नेहमीच वर्षाने अच्छादित असतो त्यामुळे रस्त्याचा पत्ताही नाही.

 

30 वर्षापूर्वी 600 लोक राहायचे-

 

- गावात राहणारे 35 वर्षीय अलेक्जेंडर सांगतात की, सुमारे 30 वर्षापूर्वी येथे 600 लोक राहायचे. 
-इतर सामान्य गावांप्रमाणे येथील लोक शेती व पशुपालन करायचे. उत्पन्नाचा स्रोत यूक्रेनच होता, मात्र सेव्हियत यूनियनचे विघटन झाले हे यूक्रेनमधून रशियात आले. 
- यूक्रेन वेगळा देश होताच या गावात उत्पन्नाचे कोणताही मार्ग राहिला नाही. त्यामुळे येथील हळू हळू जवळच्या येकातेरिनबर्ग सिटीत जाऊ लागले. 
- येकातेरिनबर्ग सिटीत स्टीलच्या खूप कंपन्या आहेत. जेथे लोकांना सहज नोकरी मिळते. त्यामुळे तेथे लोक लागलीच शिफ्ट होऊ लागले.
- आता येथे फक्त 12 लोक राहतात. ज्यांचे या गावावर प्रेम आहे त्यामुळे तो गाव सोडून जात नाहीत. त्यामुळे या 12 लोकांसाठी रोज येकातेरिनबर्गमधून एक बोगी असलेली ट्रेन येते-जाते.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रशियातील शेवटच्या टोकाला वसलेल्या 12 लोकांच्या गावाचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...